Vidhan Sabha 2019 : विधानसभेतही भाजप विद्यमानांचे तिकीट कापणार?

bjp
bjp

मुंबई : लोकसभा निवडणुकीत भाजपने निष्क्रीय खासदारांचा पत्ता कट केला होता. आता विधानसभा निवडणुकीतही अशा काही निष्क्रीय आमदारांना घरी बसावे लागणार आहे. आता कोणा कोणाची तिकीट कापले जाणार याविषयी  उत्सुकला लागली आहे. भाजपमधील विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जवळपास २५ विद्यमान आमदारांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता आहे.

काय आहे सूत्रांची माहिती?
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांची घोषणा झाली आहे. राजकीय पक्षांनी उमेदवारीची घोषणा करण्यास अद्याप सुरुवात केलेली नसली तरी, त्यांच्या याद्या मात्र तयार झाल्या आहेत. यात काँग्रेसची पहिली संभाव्य यादी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, उमेदवारीची घोषणा अद्याप कोणत्याही पक्षाने केलेली नाही. भाजप आणि शिवसेना यांच्यात अद्याप युतीची अंतिम चर्चा झालेली नाही. काही दिवसांपूर्वी भाजप शिवसेनेशिवाय १६० जागा जिंकू शकते, असे सर्वेक्षण झाल्याची कुजबूज सुरू होती. पण, त्यावर पक्षाकडून कोणतेही अधिकृत उत्तर देण्यात आलेले नाही. दोन्ही पक्षांमध्ये आणि त्यांच्या मित्रपक्षांमध्ये अद्याप जागा वाटपावर शिक्कामोर्तब झालेले नाही. पण, भाजपची पहिली यादी ११५ जणांची असून, ती तयार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विद्यमान २५ आमदारांना पक्ष निवडणुकीतून डच्चू देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. या संदर्भात पक्षाने अंतर्गत सर्वेक्षण करून, आमदारांच्या कामाविषयी मतदार समाधानी आहेत की नाही, याची माहिती घेतली होती. त्यानंतरच या आमदारांना थांबवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे पक्षातील सूत्रांनी सांगितले. यादीत १०० आमदारांचा समावेश असून, १५ उमेदवार हे, आयात असल्याची माहिती आहे. त्यामुळे पहिल्या यादीतून १५ आणि पुढच्या यादीत १० विद्यमान उमेदवारांना घरी बसावे लागणार आहे.  

लोकसभेत यांचा पत्ता कट

  1. शरद बनसोडे – सोलापूर
  2. अनिल शिरोळे – पुणे
  3. दिलीप गांधी – नगर
  4. सुनील गायकवाड – लातूर
  5. हरिश्चंद्र चव्हाण – दिंडोरी
  6. मुंबई उत्तर पूर्व – किरीट सोमय्या

बीडची उमेदवारी आणि शरद पवार
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बीड दौऱ्यात असताना तेथील पाच उमेदवारांची घोषणा केली होती. पण, त्यानंतर पवार यांनी, ‘अशा प्रकारे उमेदवारी घोषित करणं, माझी चूक होती. कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव उमेदवारी जाहीर केली,’ अशी कबुली दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com