युतीचा निर्णय गुलदस्त्यातच; काय म्हणाले उद्धव ठाकरे?

uddhav thackeray
uddhav thackeray

मुंबई : शिवसेना आणि भाजप युती होणार की नाही, अशी राजकीय स्थिती गेल्या काही दिवसांपासून आहे. त्यावर दोन्ही पक्षांकडून स्पष्ट खुलासा होताना दिसत नाही. आज, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. पण, युतीचा फॉर्म्युला लोकसभा निवडणुकीच्या वेळीच ठरलेला आहे, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी युती संदर्भात कोणतिही स्पष्ट घोषणा केलेली नाही.

दरम्यान, आज मुंबईत भाजपच्या नेत्यांचीही बैठक झाली. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आशिष शेलार यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. त्या बैठकीनंतरही युती संदर्भात कोणतिही ठोस घोषणा झालेली नाही.

शिवसेना भवनात बैठक
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची आज, मुंबईत सेनाभवनात बैठक झाली. बैठकीत शिवसेनेच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. पत्रकार परिषदेत अपेक्षेप्रमाणे उद्धव ठाकरे यांना युती संदर्भातच सर्वाधिक प्रश्न विचारण्यात आले. त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले, ‘युतीचा फॉर्म्युला लोकसभा निवडणुकीच्यावेळीच ठरला आहे. येत्या दोन दिवसांत युतीची घोषणा होईल. युतीच्या १३५-१३५ फॉर्म्युल्याची सध्या चर्चा सुरू आहे. पण, ही चर्चा माध्यमांमध्येच सुरू आहे. युतीमध्ये नाही. पाच वर्षांत युतीमध्ये काही मंत्र्यांनी एकमेकांवर टीका केली असली तरी, तो अपवाद वगळता. युतीने एकत्र विकासकामे केली आहेत. विकासकामांमध्ये शिवसेनेचा वाटाही मोठा आहे.’

विकासकामांना विरोध नाही
शिवसेनेचा विरोध विकासकामांना नाही, असे उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. ते म्हणाले, ‘मेट्रोच्या आरेमधील कारशेडला आम्ही तेथील वनसंपदेमुळे विरोध केला आहे. शिवसेनेचा विकासकामांना कोणताही विरोध नाही. आमचाही विकासकामांमध्ये मोठे योगदान आहे.’ गेल्या काही दिवसांपासून नाणार प्रकल्प आणि आरे येथील मेट्रो कारशेड यावरून शिवसेना-भाजपमध्ये मतभेद असल्याचे चित्र आहे. मंबईत आरे येथे मेट्रो कारशेड उभारण्यास सुरुवातीला मनसेने विरोध केला. त्यानंतर युवा सेनेचे नेते उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन कारशेड विरोधात भूमिका स्पष्ट केली होती.

भाजपचीही बैठक
भाजपच्या नेत्यांनी मुंबईत आज विशेष बैठक झाली. त्याला प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आशिष शेलार यांच्यासह भाजपचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. त्या बैठकीनंतर चंद्रकांत पाटील यांनी युतीचा कोणताही फॉर्म्युला ठरलेला नाही, असे स्पष्ट केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com