निवडणूक आयोगाची चित्ररथाद्वारे मतदार जागृती 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 1 फेब्रुवारी 2017

मुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी राज्य निवडणूक आयोगातर्फे चित्ररथाद्वारे शहरात ठिकठिकाणी मतदार जागृती करण्यात येत असून, त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. 

प्रजासत्ताक दिनानिमित्त येथील शिवाजी पार्कवर झालेल्या संचलनात या चित्ररथाचा समावेश होता. 73 आणि 74 व्या राज्य घटना दुरुस्तीला 25 वर्षे होत असल्याच्या आणि सध्या सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा चित्ररथ तयार करण्यात आला आहे. सर ज. जी. कला महाविद्यालयाने त्याची निर्मिती केली आहे. इतर विविध माध्यमांतूनही मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी प्रयन्त केल जात आहे. चित्ररथ त्याचाच एक भाग आहे. चित्ररथाची आकर्षक रचना व रंगसंगतीमुळे त्याकडे लक्ष वेधले जात आहे. चित्ररथावर एलएडी पडता असून, त्यावर विविध ध्वनिचित्रफिती व जागृतीपर संदेशही दाखविण्यात येत आहेत. 

Web Title: Voter awareness by the election commission chitrarath