येत्या २४ तासांत मुंबईसह राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज
राज्यातील अनेक भागात येत्या 48 तासांत अवकाळी पावसाचा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
मुंबई: राज्यातील अनेक भागात येत्या 48 तासांत अवकाळी पावसाचा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने व्यक्त केला आहे. ठाणे-रायगडसह 10 जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्याची शक्यता ही वर्तवण्यात आली आहे.
मुंबई, गोव्यातून घेतलेल्या रडार प्रतिमा सिंधुदुर्ग जवळील गोवा किनारपट्टीवर तीव्र प्रतिध्वनी दर्शविल्या आहेत. उत्तर गोवा आणि दक्षिण सिंधुदुर्ग किनारपट्टी, सावंतवाडी इत्यादीवर जोरदार वारा, वादळीवाऱ्याची शक्यता आहे. पुणे, नगर, रायगड जिल्ह्यात ही विजांचा कडकडाटासह पाऊसाची अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
गुरुवारी दिवसभर संपूर्ण राज्यात ढगाळ वातावरण होते. त्यामुळे हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्ग, गोवा आणि कर्नाटक किनारपट्टीवर पावसाळी वातावरण तयार झाले असल्याचे उपग्रह प्रतिमेत दिसून आले आहे. त्यावरून खबरदारी घेण्याची आणि सावधगिरी बालगण्याची चेतावणी देण्यात आली आहे.
मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
दक्षिण मध्य अरबी समुद्रापासून मध्य महाराष्ट्रापर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने राज्यात पावसाळी वातावरण तयार आहे. त्यामुळे आज आणि उद्या 9 जानेवारीला राज्यात पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
थंडीचा जोर ओसरला
मुंबईसह काही राज्यांमध्ये थंडीचा जोर ओसरला आहे. कोकण ते उत्तर-मध्य महाराष्ट्रापर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. समुद्रातून बाष्प येत असल्याने थंडी पूर्णपणे गायब होऊन किमान तापमानात वाढ झाली आहे.
हेही वाचा- मुंबईत आज राजावाडी, कूपर आणि बीकेसीत लसीकरणासाठी ड्राय रन
-----------------------------------
(संपादन- पूजा विचारे)
weather alert rain update mumbai state Mumbai Regional Meteorological Department 9th january