पश्‍चिम रेल्वे महागणार!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 नोव्हेंबर 2016

कमी अंतराच्या तिकीट दरात वाढ; पहिला टप्पा पाच कि.मी.चा
मुंबई - पश्‍चिम रेल्वेच्या प्रवाशांचा लोकल प्रवास आता महागणार आहे. तिकीट दरासाठी वर्षानुवर्षे निश्‍चित केलेला किलोमीटरचा टप्पा बदलण्याचे प्रस्तावित आहे. पहिला टप्पा 10 ऐवजी पाच कि.मी.पर्यंत मर्यादित केला गेला आहे. या बदलाने लहान अंतरासाठी प्रवाशांना तिकिटासह मासिक पासाकरताही जादा पैसे मोजावे लागण्याची शक्‍यता आहे. तूर्त हा प्रस्ताव पश्‍चिम रेल्वेच्या मुख्यालयात मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे.

चर्चगेट ते डहाणूपर्यंत विस्तारलेल्या पश्‍चिम रेल्वेच्या उपनगरी लोकलमधून दररोज 36 लाखांहून अधिक नागरिक प्रवास करतात. तरीही पश्‍चिम रेल्वेला वर्षाला 700 कोटींचा तोटा सहन करावा लागतो. ही आर्थिक तूट कमी करण्यासाठी पश्‍चिम रेल्वेच्या मुंबई विभागीय रेल्वे मंडळाने तिकीट दरवाढीचा प्रस्ताव तयार केला आहे. त्यात किलोमीटरचा टप्पा बदलण्याचा प्रस्ताव आहे. सध्याच्या रचनेनुसार पहिला टप्पा एक ते 10 कि.मी.चा आहे; आता तो पाच कि.मी.पर्यंत आणण्याचा प्रस्ताव आहे. टप्याटप्याने हा बदल केला जाणार आहे. या प्रस्तावामुळे दैनंदिन तिकीट व मासिक पासाच्या दरात सरासरी 15 टक्के वाढ अपेक्षित आहे.

किलोमीटरच्या टप्प्यातील बदल प्रस्तावित आहे आणि तो मंजुरीसाठी मुख्यालयात पाठवण्यात आला आहे. मंजुरी मिळाली तरच प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठवला जाईल, अशी माहिती पश्‍चिम रेल्वेच्या मुंबई मंडळाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक मुकल जैन यांनी "सकाळ'ला दिली.

363 कोटींचा महसूल
एप्रिल ते ऑगस्ट 2016 या कालावधीत पश्‍चिम रेल्वेच्या उपनगरी प्रवाशांत 0.67 टक्का वाढ झाली आहे. या सहा महिन्यांत 62 कोटी 13 लाख मुंबईकरांनी प्रवास केला. त्यातून 363 कोटी 34 लाखांचा महसूल रेल्वेला मिळाला.

सर्वाधिक गर्दीची स्थानके स्थानके - प्रवासी
- बोरिवली - दोन लाख 73 हजार
- अंधेरी - दोन लाख 50 हजार
- नालासोपारा - दोन लाख एक हजार
- विरार - एक लाख 20 हजार

मध्य रेल्वेचीही भाडेवाढ ?
रेल्वे बोर्डाने किलोमीटरचा टप्पा बदलण्यास मंजुरी दिली, तर मध्य रेल्वेही भाडेवाढ करण्याची शक्‍यता आहे. मध्य रेल्वेच्या उपनगरी लोकलने दररोज 40 लाख प्रवासी प्रवास करतात. तरीही मध्य रेल्वेला 800 कोटींचा तोटा होतो. यंदाच्या आर्थिक वर्षातील पहिल्या सहा महिन्यांत रेल्वेला 424 कोटी आठ लाखांचा महसूल मिळाला.

सध्याचे तिकीट दर
चर्चगेट ते मालाड - 10 रुपये (एकेरी प्रवास)

प्रस्तावित दर
चर्चगेट ते महालक्ष्मी - 10 रुपये (एकेरी प्रवास)

Web Title: western railway rate increase