तरुणांमधील नेतृत्वगुणांची दखल घेतली जाऊ शकते

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 27 नोव्हेंबर 2016

राजकारणात येणाऱ्या नव्या पिढीने स्वच्छ चारित्र्य, पारदर्शी कारभार, जनमानसांत काम करण्याची आणि सामान्यांना आधार वाटेल अशाप्रकारे स्वतःमध्ये बदल करायला हवा. तरच राजकीय क्षेत्रात त्यांच्या नेतृत्वगुणांची दखल घेतली जाऊ शकते, असा सल्ला ज्येष्ठ राजकीय विश्‍लेषक अभिनंदन थोरात यांनी आज यिनच्या कार्यशाळेत सहभागी झालेल्या सदस्यांना दिला.

राजकारणात येणाऱ्या नव्या पिढीने स्वच्छ चारित्र्य, पारदर्शी कारभार, जनमानसांत काम करण्याची आणि सामान्यांना आधार वाटेल अशाप्रकारे स्वतःमध्ये बदल करायला हवा. तरच राजकीय क्षेत्रात त्यांच्या नेतृत्वगुणांची दखल घेतली जाऊ शकते, असा सल्ला ज्येष्ठ राजकीय विश्‍लेषक अभिनंदन थोरात यांनी आज यिनच्या कार्यशाळेत सहभागी झालेल्या सदस्यांना दिला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आजची प्रतिमा म्हणजे सर्वसामान्यांना आधाराचा महामेरु, अशी निर्माण झालेली आहे. आजच्या काळात जनतेला असाच नेता अपेक्षित आहे, त्यामुळे तरुणांनी राजकारणात सर्वसामान्यांना आधार वाटेल, असा लोकप्रतिनिधी होण्याची तयारी ठेवायला हवी, असे ते म्हणाले. यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क (यिन) जिल्हाप्रमुखांच्या कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी झालेल्या दुपारच्या सत्रात थोरात यांनी उपस्थित सदस्यांना राजकीय क्षेत्रात प्रवेश करताना आवश्‍यक असलेल्या साध्या-सोप्या पण महत्त्वाच्या बाबींची माहिती दिली. 

देशात नोटाबंदी जाहीर झाल्यानंतर अनेक जुने विषय, जसे जातीचे राजकारण वगैरे मागे पडले, याचे भान विद्यार्थ्यांमध्ये यायला हवे. नोटाबंदीमुळे तरुणाईवर काय परिणाम झाला, याची माहिती मंत्रिमंडळ म्हणून यिनच्या सदस्यांनी घ्यायला हवी. त्यावर चर्चा करायला हवे, त्यातूनच अनेक नवे विषय तयार होतात, अशी शिकवण थोरात यांनी दिली. नोटबंदीचा निर्णय हा नियोजनबद्ध निर्णय आहे. फक्त त्याची अंमलबजावणी धक्कातंत्राने केली, असेही त्यांनी एका प्रश्‍नाच्या उत्तरात सांगितले. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या अनेक प्रश्‍नांना त्यांनी सविस्तर उत्तरे दिली.

देशात नोटाबंदी जाहीर झाल्यानंतर अनेक जुने विषय, जसे जातीचे राजकारण वगैरे मागे पडले, याचे भान विद्यार्थ्यांमध्ये यायला हवे. नोटबंदीमुळे तरुणाईवर काय परिणाम झाला, याची माहिती मंत्रिमंडळ म्हणून यिनच्या सदस्यांनी घ्यायला हवी. 

निवडणुकांत यिनचा आदर्श
पूर्वी महाविद्यालयांमध्ये निवडणुका व्हायच्या; मात्र गैरप्रकार घडल्यामुळे या निवडणुका बंद करण्यात आल्या. गैरप्रकाराशिवाय निवडणुका होऊ शकतात, हे यिनच्या निवडणुकांमुळे सिद्ध झाले आहे. त्यामुळे विद्यापीठांनीही पुन्हा निवडणुका सुरू केल्या, तर त्याबाबत आश्‍चर्य वाटायला नको, असे कौतुकही थोरात यांनी केले.

Web Title: Youth leadership qualities can be recognized