"आई राजा उदो'च्या घोषात तुळजापूरमध्ये घटस्थापना 

Sakal | Friday, 22 September 2017

तुळजापूर - "आई राजा उदो उदो'च्या जयघोषात तुळजाभवानी मंदिरात गुरुवारी नवरात्रोत्सवाला सुरवात झाली. मंदिरात दुपारी साडेबाराच्या सुमारास घटस्थापना झाली. 

तुळजापूर - "आई राजा उदो उदो'च्या जयघोषात तुळजाभवानी मंदिरात गुरुवारी नवरात्रोत्सवाला सुरवात झाली. मंदिरात दुपारी साडेबाराच्या सुमारास घटस्थापना झाली. 

शेजघरातील निद्रिस्त देवीची मूर्ती मध्यरात्रीनंतर अडीचच्या सुमारास सिंहासनावर अधिष्ठित करण्यात आली. परंपरेनुसार अभिषेक पूजा, धुपारती झाली. मुख्य गाभाऱ्यातून अंगारा मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर गोमुख तीर्थकुंडापासून जलकुंभाच्या मिरवणुकीस प्रारंभ झाला. देवीच्या सिंहाच्या गाभाऱ्याजवळ घटस्थापना झाली. जिल्हाधिकारी तथा मंदिर समितीचे अध्यक्ष राधाकृष्ण गमे, त्यांच्या पत्नी भारती गमे यांच्या उपस्थितीत धार्मिक विधी झाले. तुळजाभवानी मातेच्या घटस्थापनेनंतर मंदिरातील येमाई, खंडोबा या उपदैवतांची घटस्थापना झाली.  देवीच्या दर्शनासाठी पहिल्या दिवशी भाविकांनी गर्दी केली होती.