कणकवली : बालेकिल्ल्यात नीतेश राणेे आघाडीवर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑक्टोबर 2019

कणकवली : बालेकिल्ल्यात नीतेश राणे आघाडीवर |Election Results 2019
सिंधुदुर्ग : कणकवली मतदारसंघात पहिल्या पोस्टल मतमोजणीत भाजपचे उमेदवार नीतेश राणे 713 मतांनी आघाडी आघाडीवर आहेत. शिवसेनेचे उमेदवरा सतीश सावंत यांनी त्यांनी पिछाडीवर टाकले आहे.

कणकवली : बालेकिल्ल्यात नीतेश राणे आघाडीवर |Election Results 2019
सिंधुदुर्ग : कणकवली मतदारसंघात पहिल्या पोस्टल मतमोजणीत भाजपचे उमेदवार नीतेश राणे 713 मतांनी आघाडी आघाडीवर आहेत. शिवसेनेचे उमेदवरा सतीश सावंत यांनी त्यांनी पिछाडीवर टाकले आहे.
सिंधुदुर्ग सर्वांत हायव्होल्टेज लढत कणकवलीत होत असून, येथे शिवसेनेचे
सतीश सावंत आणि भाजपचे उमेदवार नितेश राणे यांच्यात तगडा मुकाबला आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीतदेखील प्रचाराचा मुख्य रोख राणे यांच्याभोवतालीच
फिरताना दिसत आहे. राज्यात भाजप - शिवसेनेची युती असतानाही नारायण राणे यांचे सुपुत्र नीतेश राणे यांनी शिवसेनेने थेट आव्हान दिल्याने अकरावी सार्वत्रिक
विधानसभा निवडणूक सिंधुदुर्ग जिल्ह्यात चुरशीची ठरली. सतीश सावंत यांनी अलीकडेच राणेंची साथ सोडून शिवसेनेत प्रवेश केला. ते सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष आहेत.
सतीश सावंत यांच्या उमेदवारीमुळे आता तळ कोकणात नारायण राणे विरुद्ध शिवसेना असा सामना आहे. दरम्यान, जिल्ह्यातील सर्व उमेदवारांना आपणच विजयी होणार असल्याचा विश्‍वास एकीकडे असताना सिंधुदुर्गात मात्र याचवेळी दोन विभिन्न राजकीय चर्चा सुरु आहेत. त्या म्हणजे कोण कोणाला क्‍लीन स्वीप देणार ? सिंधुदुर्गात राणेंचे साम्राज्य संपवणार असा दावा करत शिवसेनेने भाजपची अधिकृत जागा असतानाही कणकवलीत आपला एबी फॉर्म देवून सतीश सावंत यांना रिंगणात उतरविले.

भाजपने राणे कुटुंब सोडून कोणालाही उमेदवारी दिली तर शिवसेनेचा पाठिंबा राहील. अन्यथा शिवसेना उमेदवार देणार, अशी भूमिका घेतली. भाजपनेही नंतर भाजपने
कोणाला उमेदवारी द्यायची, हे शिवसेनेने ठरवू नये असे जाहीर केले; मात्र या भानगडीत शिवसेना व भाजप या दोन्ही पक्षांना एकमेकांना क्‍लीन स्वीपची स्वप्ने पडू
लागली आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra Vidhan Sabha 2019 election result Kankavali Kudal Sawantwadi trends