रत्नागिरी : रत्नागिरीत राष्ट्रवादीचे आमदार संजय कदम यांना अटक | Election Results 2019

 सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑक्टोबर 2019

रत्नागिरी : आचारसंहिता चालू असताना रॅली काढल्याने राष्ट्रवादीचे आमदार संजय कदम यांना अटक करण्यात आली. आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. 

रत्नागिरी : आचारसंहिता चालू असताना रॅली काढल्याने राष्ट्रवादीचे आमदार संजय कदम यांना अटक करण्यात आली. आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. 
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता चालू असताना राष्ट्रवादीचे आमदार संजय कदम यांनी  बुधवारी (ता. 23) रात्री विनापरवाना रॅली काढली होती. गाड्यांच्या ताफ्यासह काढलेल्या रॅली राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पोलिसांनी त्यांची रॅली अडवल्याने पोलिस आणि कदम यांच्यात शाब्दिक बाचावाची झाली. कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर पोलिसांनी आमदार कदम यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्यावर आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे परिसरात वातावरण तापले आहे. पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP MLA Sanjay Kadam arrested

टॅग्स
टॉपिकस