भिक नको, घेऊ घामाचे दाम- 'स्वाभिमानी'चा नारा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 ऑक्टोबर 2016

जयसिंगपूर- "भिक नको, घेऊ घामाचे दाम", "उठ किसान घे मशाल, अन्यायाला जाळ खुशाल" असा नारा देत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊस परिषदेला जल्लोषात सुरवात केली. 

येथे आज दुपारी सभेचे ठिकाण बदलेले असले तरी दुपारपासून स्वाभिमानी कार्यकर्त्यांची सभा स्थानाकडे गर्दी होती. स्वाभिमानाचे झेंडे, टी शर्ट घालून कार्यकर्ते मोटरसायकलने सभेच्या ठिकाणी येत होते. 'ऑक्टोबर हीट' जाणवत असूनही कार्यकर्ते दुपारी तीन वाजल्यापासूनच झेले चित्रमंदिरानजीकच्या मैदानावर दाखल होत होते. "भिक नको, घेऊ घामाचे दाम", "उठ किसान घे मशाल, अन्यायाला जाळ खुशाल" अशा आशयाचा व्यासपीठावरील फलक लक्ष वेधून घेत होता.

महाराष्ट्रासह कर्नाटक भागातून कार्यकर्ते, ऊस उत्पादक सभेसाठी येथे दाखल होत होते. सभा सायंकाळी सुरू होणार असली तरी दुपारपासूनच विविध भागातून आलेले तालुका जिल्हा पातळीवरील स्वाभिमानी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मनोगते व्यक्त केली. या मध्ये 10 वर्षाच्या मुलीसह 90 वर्षाच्या जेष्ठ कार्यकर्त्यांनी आपल्या भावना मांडल्या. राजकीय स्वार्थामुळे ऊस उत्पादकांची झालेली बिकट अवस्था प्रत्येकजण मांडत होता.

महिलांचा सहभाग लक्षात घेऊन त्यांच्यासाठी खास व्यवस्था करण्यात आली होती. संघटनेच्या प्रथेप्रमाणे यंदाही उपस्थितीत शेतकऱ्यांकडून संघटनेसाठी देणगी संकलित करण्यात आली. सकाळने या परिषदेचे आज खास वार्तांकन केले. त्याची चर्चा शेतकऱ्यांमध्ये होती. स्वाभिमानी युवक संघटनेचे कार्यकर्ते नियोजनात व्यस्त होते. दुपारी चार वाजता खासदार राजू शेट्टी, कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचे व्यासपीठावर आगमन होताच मोठा जल्लोष झाला. कार्यक्रम सुरू होण्याआधी शाहिदाना श्रद्धांजली वाहण्यात आली.