भानगाव प्रकरणी चौकशी आदेश; पीडित कुटुंबाला पोलिस सरंक्षण

Bhangaon case inquiry order; Police protection to the victim's family
Bhangaon case inquiry order; Police protection to the victim's family

श्रीगोंदे (नगर) : भानगाव येथे आदिवासी महिलेला विवस्त्र करून मारहाण प्रकरणी राज्य सरकारने चौकशीचे आदेश दिले आहेत. आज  राज्‍य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्‍य (विधी) माजी न्‍यायाधीश सी. एल थूल व सदस्‍य सचिव डॉ. संदेश वाघ यांनी पीडित कुटूंबाची भेट घेऊन विचारपूस करून त्यांना एक लाखाचा धनादेश दिला. घटना घडल्यानंतर गुन्हा नोंदविण्यास उशीर करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यावर कारवाईची शिफारस करणार असल्याचे सांगत थुल यांनी त्या कुटुंबाला वाढीव पोलिस संरक्षण देण्याचे आदेश दिले. 

दरम्यान समोरच्या काही लोकांनी थुल यांची तेथेच भेट घेऊन वास्तव वेगळे आहे असे सांगितल्यावर जे साक्षीदार आहेत त्यांच्या साक्षी नोंदवून घेण्याचे आदेश देण्यात आले. थुल व वाघ यांनी आज सकाळीच घटनास्थळी भेट दिली. त्यांच्या समवेत पोलिस उपअधीक्षक सुदर्शन मुंडे, तहसीलदार महेंद्र माळी व इतर अधिकारी होते.

थुल यांनी त्या कुटूंबाची आस्थेवाईकपणे चौकशी करून नेमके काय झाले याची विचारणा केली त्यावर पीडित महिला व तिचा पती यांनी डोळ्यात पाणी आणून घटना सांगितली. महिलेला मोठ्या अंरापर्यंत मारहाण करीत आणले, तिच्या ब्लाउजला हात घातला. सोडविण्यासाठी पती आल्यावर त्यालाही बेदम मारहाण झाली. आम्ही पोलिस ठाण्यात गेल्यावर आम्हाला खोटे ठरविण्यात आले. त्यावेळी आत्महत्या करण्याचा विचार आला पण नंतर मुंडे यांनी त्यांची फिर्याद नोंदवली. आम्हाला समोरच्या लोकांपासून धोका असून आम्हाला वाचवा अशी विनवणी पीडित कुटूंबाने थूल यांच्याकडे केली.

सगळी घटना ऐकल्यानंतर थुल यांनी त्यांच्या समवेत आलेल्या समाज कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांकडून आलेला एक लाख रुपये मदतीचा धनादेश पीडित कुटुंबाला दिला. थुल म्हणाले, याप्रकरणाची गंभीर दखल सरकारने घेतली आहे. पीडित महिलेवर मोठा अन्याय झाला असतानाही गुन्हा उशिरा दाखल का झाला? समोरच्या लोकांना अगोदर मदत का झाली का या सगळ्या गोष्टींची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. शिवाय सगळी परिस्थिती समजून घेतल्यानंतर वेळेवर फिर्याद न घेणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी शिफारस आपण करणार आहोत. 

सदर कुटुंबाला वाढीव पोलिस संरक्षण लगेच देण्याचे आदेश यावेळी थुल यांना मुंडे यांना दिले. दरम्यान काही अंतरावर थांबलेल्या आदिवासी व इतर समाजातील महिला व पुरुषांनी त्यांची बाजू ऐकून घेण्याची विंनती थुल यांनी मान्य करीत घटना घडली तेथे गेले. त्यावेळी त्या कुटुंबाची आसपास मोठी दहशत असून शेतकऱ्यांना शेती पिकविताही येत नसल्याची व्यथा मांडली. सुरोडी येथील आदिवासी समाजाच्या माजी सरपंच सुमन चव्हाण यांनी त्या घटनेच्या साक्षीदार असून घटना वेगळीच असल्याचे सांगताच थुल यांनी साक्षीदार यांचे जबाब नोंदवून घेण्याचे आदेश केले. जमिनीचे वादाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बोलतो असेही सांगितले. 

पोलिस अधिकारी अडचणीत

याप्रकरणी सरकारने चौकशीचे आदेश करीत उशिरा फिर्याद घेणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाईची शक्यता थेट थुल यांनीच वर्तविल्याने श्रीगोंदे पोलिस ठाण्याचे निरीक्षक बाजीराव पोवार चांगलेच अडचणीत येण्याचे चिन्हे आहेत.

मुळ घटनाक्रम वाचण्यासाठी क्लीक करा..

पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा; महिलेला विवस्त्र करून मारहाण (व्हिडिओ)http://www.esakal.com/maharashtra/beaten-woman-nakedness-nagar-shrigonda-145953

महिलेस विवस्त्र करून मारहाण: कोणी न्याय देता का न्याय?http://www.esakal.com/maharashtra/beaten-woman-nakedness-nagar-shrigonda-incident-146088

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com