गुन्हेपीडितांना मिळणार भरपाई; 2 ऑक्‍टोबरपासून नवी योजना 

गुन्हेपीडितांना मिळणार भरपाई; 2 ऑक्‍टोबरपासून नवी योजना 

सोलापूर : बलात्कारासह अन्य लैंगिक अत्याचार, जिवंत जाळण्याचे प्रकार आणि अॅसिड हल्ला अशा गुन्ह्यांमधील पीडित व्यक्‍तींना सरकारकडून ठरावीक रक्‍कम भरपाई म्हणून दिली जाणार आहे. त्यासाठी प्रत्येक राज्य स्वतंत्र निधी स्थापन करणार आहे. 2 ऑक्‍टोबरपासून या नव्या योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे. 

गुन्ह्यातील स्त्री-पुरुष अशा दोघांही गुन्हेपीडितांसाठी ही योजना राबविली जाणार आहे. त्यात दिल्या जाणाऱ्या भरपाईच्या रकमेला कोणतीही कमाल मर्यादा असणार नाही. सरकार भरपाई योजना व त्याबाबतची नवी नियमावली तयार करत नाही, तोपर्यंत ही योजना लागू असणार आहे. त्या प्रकारचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच सर्व राज्यांना सूचित केले आहे. दिल्लीतील निर्भया अत्याचार व हत्याकांडानंतर अशा भरपाईचा विषय न्यायालयासमोर आला होता. त्यानंतर न्यायालयाच्या निर्देशानुसार ही योजना 2 ऑक्‍टोबरपासून सुरू होणार आहे. सद्यस्थितीत वाढत असलेल्या महिलांवरील अत्याचार प्रकरणामुळे राज्य सरकारला या योजनेसाठी मोठा निधी उभारावा लागणार आहे. 

गुन्हानिहाय किमान भरपाई 
- लैंगिक अत्याचारातून मृत्यू : पाच लाख 
- सामूहिक अत्याचार : पाच लाख 
- अत्याचार - पाच लाख 
- अत्याचारामुळे गर्भारण : तीन लाख 
- अनैसर्गिक लैंगिक अत्याचार : चार लाख 
- ऍसिड हल्ल्याने विद्रुपता अथवा मृत्यू : सात लाख 
- हल्ल्यामुळे गर्भपात अथवा नपुंसकत्व : दोन लाख 
- जळितकांडात मृत्यू : सात लाख 

गुन्हे पीडितांवर मोफत उपचार व्हावेत अथवा त्यांच्या मृत्यूनंतर कुटुंबाला अर्थसाहाय्य मिळावे, या उद्देशाने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही नवी योजना सुरू होईल. त्याबाबत मंत्रिमंडळाची लवकरच बैठक होणार आहे. 

- विजयकुमार देशमुख, पालकमंत्री तथा आरोग्य राज्यमंत्री

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com