कार्तिकी एकादशीच्या महापूजेसाठी मुख्यमंत्र्यांना निमंत्रण

भारत नागणे
सोमवार, 1 ऑक्टोबर 2018

पंढरपूर : आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेचा लाभ चुकलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कार्तिकी एकादशीच्या शासकीय महापूजेसाठी निमंत्रण देण्यात येणार आहे. त्याच दिवशी सुमारे 75 कोटी रुपये खर्च करुन उभारण्यात आलेल्या भक्तनिवासाचे लोकार्पण ही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्याचा आमचा प्रयत्न असल्याची माहिती  मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी आज सकाळ शी बोलताना दिली.

यावर्षी आषाढी यात्रा काळात  आरक्षण प्रश्नांवरुन राज्यभरात मराठा समाजाने आंदोलन पुकारले होते. त्यातच मराठा  आरक्षण कृती समितीचे समन्यक रामभाऊ गाकयवाड यांनी आषाढी एकादशीच्या विठ्ठलाच्या शासकीय महापूजेसाठी पंढरपूरात येऊ देणार नाही असा इशारा दिला होता.  त्यांच्या इशारानंतर राज्यभरात मोठी खळबळ उडाली होती.  पंढरपूरचे आमदार भारत भालकेंनी देखील मुख्यमंत्र्यांनी विठ्ठलाच्या शासकीय महापूजेसाठी येऊनये असाच सूर आळवला होता.  मुख्यमंत्री महापूजेसाठी येणार असतील तर यात्रेत साप सोड असा गंभीर इशाराही दिला होता. या प्रकारावरुन विधानसभेत सत्ताधारी व विरोधी सदस्यांमध्ये चांगलाच राडा झाला होता. अखेर मुख्यमंत्र्यांनी पंढरपूरातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊनये यासाठी स्वतःहून आषाढीच्या शासकीय महापूजेसाठी येणार नाही असे जाहीर करुन या वादावार पडदा टाकला होता.

मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस हे विठ्ठलाचे निस्मिःभक्त आहेत.  यापूर्वी त्यांनी मुख्यमंत्री म्हणून तीनवेळा आषाढी एकादशीची शासकीय महापूजा केली आहे. यंदा मात्र आषाढीची महापूजेचा त्यांनी केली नव्हती. मुख्यमंत्री आषाढी वारीला न आल्याची सल अाजही वाकर्यांमध्ये आहे.  त्यामुळेच आषाढीचा चुकलेला लाभ कार्तिकीच्या निमित्ताने पूर्ण करण्यासाठीच मुख्यमंत्र्यांना 19 नोव्हेंबर रोजी कार्तिक एकादशीच्या शासकीय महापूजेसाठी  निमंत्रीत केले जाणार आहे.  त्याच दिवशी मंदिर समितीने सुमारे 75 कोटी रुपये खर्च करुन भाविकांसाठी उभारलेल्या सुसज्ज अशा भक्तनिवासाचे उदघाटन देखील केले जाणार असल्याचेही डॉ.भोसले यांनी सांगितले.

Web Title: Invitation to Chief Minister for the Mahapuja of Kartiki Ekadashi