किणी टोलनाक्यावर दूध आंदोलन पेटले; महामार्ग रोखला

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 जुलै 2018

कोल्हापूर : भर पावसात स्वाभिमानीचे दूध आंदोलन आज पेटले. कार्यकर्ते मोठ्या संख्येने किणी टोल नाक्‍यावर जमले. पोलिसांनी नेते आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले व पुन्हा सोडले. टोल नाक्‍यावर सुमारे 4 ते 5 हजार कार्यकर्ते एकत्र आले असून त्यांनी महामार्ग रोखण्यास सुरूवात केली. 

कोल्हापूर : भर पावसात स्वाभिमानीचे दूध आंदोलन आज पेटले. कार्यकर्ते मोठ्या संख्येने किणी टोल नाक्‍यावर जमले. पोलिसांनी नेते आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले व पुन्हा सोडले. टोल नाक्‍यावर सुमारे 4 ते 5 हजार कार्यकर्ते एकत्र आले असून त्यांनी महामार्ग रोखण्यास सुरूवात केली. 

दूध आंदोलनामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज जनावरे आणून महामार्ग अडवण्याचे जाहीर केले. त्यामुळे सकाळीपासूनच किणी टोलनाक्‍यावर प्रचंड पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. टोल नाका बंद केला होता. त्यामुळे एकही गाडी तेथे थांबत नव्हती. दुपारी अकरा वाजण्याच्या सुमारास कार्यकर्ते येथे येऊन लागले. येणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. दुपारी 12 च्या सुमारास स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे आणि रमेश भोजकर यांना ताब्यात घेतले. 

स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे, रमेश भोजकर यांना ताब्यात घेण्यात आले. यावेळी भगवान काटे आणि पोलिसांच्यात शाब्दीक चकमक झाली. 'अजून आम्ही आंदोलन सुरू केले नाही मग आम्हाला का ताब्यात घेता. आम्ही सरकारचा निषेध करतो. सरकारने आंदोलन जरी दडपण्याचा प्रयत्न केला तरी आंदोलन करणारच.' असा निर्धार व्यक्त केला. आंदोलन होणार या भीतीने किणी टोल नाका बंद ठेवण्यात आला होता.

पोलिसांना विरोध करत काटे रस्त्यावर आडवे पडले. पण पोलीस त्यांना घेऊन गेले. दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास कार्यकर्ते टोल नाक्‍यावर मोठ्या संख्येने जमू लागले. सुमारे 4 ते 5 हजार कार्यकर्ते एकत्र आले. परिस्थिती चिघळू नये म्हणून काटे आणि भोजकर यांना पोलिसांनी टोल नाक्‍यावर आणून सोडले. यावेळी कार्यकर्त्यांनी महामार्ग अडवण्यास सुरुवात केली.

भगवानराव आंदोलनाची हवा गेली काय ? 
महादेवराव महाडिकांनी काटेंना लगावला टोला. 

 भगवानराव अजून कार्यकर्ते दिसेनात, दूध आंदोलनातील हवा गेली काय? असा टोला माजी आमदार महादेवराव महाडिकांनी स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष भगवानराव काटे यांना लगावला. यावर अजून तासाभरानं या आंदोलनाची हवा दिसत्या, नुसतं लांबनं तरी बघा असे म्हणत भगवानरावांनी प्रत्युत्तर दिले. किणी टोल नाक्‍याजवळ दोन्ही नेत्यांमध्ये हा दिलखुलास संवाद घडला.

 

 

Web Title: Milk movement agitated on Toll booth; Highway blocked