पंढरपूरातील श्री विठ्ठल मंदिराचे उत्पन्न वाढले

अभय जोशी
गुरुवार, 14 जून 2018

पंढरपूर : नुकत्याच संपलेल्या अधिक महिन्यात श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर समितीला 2 कोटी 32 लाख 51 हजार 924 रुपये उत्पन्न मिळाले आहे. मागील अधिक महिन्याच्या पेक्षा या अधिक महिन्यात मंदिर समितीला तब्बल 27 लाख रुपये जास्ती उत्पन्न मिळाले आहे. अशी माहिती श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी तथा प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली.

गरीबांचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विठ्ठलाच्या चरणी भाविकांनी 154 ग्रॅम 500 मिली सोने तसेच 4 किलो 805 ग्रॅम 300 मिली चांदी देखील अर्पण केली आहे. 

16 मे 2018 ते 13 जून 2018 या कालावधीत अधिक महिना पार पडला. या महिनाभरात सुमारे 6 लाख 95 हजार भाविकांनी पदस्पर्श तर 9 लाख 75 हजार भाविकांनी श्री विठ्ठल रुक्‍मिणीचे मुखदर्शन घेतले.

श्री विठ्ठलाच्या पायावर 34 लाख 73 हजार 851 रुपये तर श्री रुक्‍मिणीमातेच्या पायावर 9 लाख 63 हजार 507 रुपये जमा झाले. या शिवाय अन्नछत्र देणगीसाठी 1 लाख 69 हजार 747 रुपये, पावती व्दारे 66 लाख 23 हजार 873 रुपये, बुंदी प्रसाद लाडू विक्रीच्या माध्यमातून 32 लाख 5 हजार 740 रुपये, राजगिरा लाडू विक्रीव्दारे 3 लाख 78 हजार 900 रुपये, फोटो विक्रीतून 62 हजार 200 रुपये, भक्त निवास भाडे 12 लाख 285 रुपये, नित्यपूजेच्या माध्यमातून 4 लाख रुपये, चंदन उटी पूजेच्या माध्यमातून 2 लाख 40 हजार या शिवाय हुंडी पेट्या, परिवार देवता दक्षिणा पेट्या व अन्य स्वरुपातून एकूण 2 कोटी 32 लाख 51 हजार 924 रुपये उत्पन्न समितीला मिळाले. 

या शिवाय 154 ग्रॅम 500 मिली सोने तसेच 4 किलो 805 ग्रॅम 300 मिली चांदी भाविकांनी श्री विठ्ठल रुक्‍मिणी चरणी अर्पण केली. मागील तीन वर्षापूर्वीच्या अधिक महिन्यात समितीला 2 कोटी 5 लाख 37 हजार 751 रुपये उत्पन्न मिळाले होते. 
 
Web Title: Shri Vitthal Mandir increased the income of the month more