शिवजयंती मिरवणुकीवर आयोगाची नजर - सहारिया 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 फेब्रुवारी 2017

सोलापूर - महापालिका निवडणुकीतील उमेदवारांचा प्रचार शिवजयंती मिरवणुकीत दिसला तर त्याचा खर्च संबंधितांच्या खात्यात टाकला जाईल, असे राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त जे. एस. सहारिया यांनी "सकाळ'ला सांगितले. दरम्यान, मतदार जनजागृतीबाबत "सोलापूर डिजिटल पॅटर्न' राज्यभरात राबविणार असल्याचे ते म्हणाले. 

महापालिकेतील बैठकीनंतर सहारिया यांनी रविवारी (ता. 5) रात्री नॉर्थकोटमधील निवडणूक कार्यालयास भेट दिली. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची कार्यालये, संगणक विभाग, मीडिया सेल, आचार संहिता विभाग आणि बैठक व्यवस्थेची माहिती घेतली. अत्याधुनिक प्रणालीचा वापर आणि सुविधा, उमेदवाराला कोणतीही अडचण येणार नाही अशा नियोजनाबद्दल त्यांनी आयुक्तांच्या टीमचे अभिनंदन केले. जनजागृतीसंदर्भात महापालिकेने लावलेल्या डिजिटल फलकाचे केवळ कौतुकच न करता, त्याची छायाचित्रे स्वतःच्या मोबाईलमध्ये टिपली. 

शिवजयंती दिवशीच (ता.19) प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात मिरवणुका निघतात. या मिरवणुकीत कोणी प्रचार केला, तर त्याची संपूर्ण माहिती संकलित केली जाईल. त्यानुसार प्रचार करणाऱ्या उमेदवाराच्या खात्यामध्ये अंदाजे खर्च समाविष्ट केला जाईल, असेही सहारिया म्हणाले. 

"सकाळ'चे केले कौतुक.. 
आयोगाच्या सूचनेनुसार जनजागृती फलकाचा आकार अत्यंत कमी होता. त्यानुसार डिजिटल फलक लावल्यास मतदारांपर्यंत योग्य माहिती जाणार नाही, ही बाब "सकाळ'ने नजरेस आणून दिल्याचे आयुक्त विजयकुमार काळम-पाटील यांनी सहारिया यांना सांगितले. चांगली सूचना दिल्याचे सांगून सहारिया यांनी "सकाळ'चे कौतुक केले, शिवाय याच पद्धतीचे मोठे डिजिटल फलक लावण्याची सूचना आयोगाचे सचिव शेखर चन्ने यांना केली.

Web Title: solapur digiral pattern