...तर त्यांनी देशात राहू नये : उदयनराजे 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 ऑक्टोबर 2019

शाहूनगरीच्यावतीने पंतप्रधान नरेंद्र मोंदी यांचे शाही स्वागत केले जाईल.

सातारा : 370 कलम या मुद्यावर ही निवडणुक होत आहे. ही निवडणुक काश्‍मिरची आहे की महाराष्ट्राची आहे असे विरोधक विचारत आहेत असा प्रश्न उदयनराजेंना करताच ते भडकले. ते म्हणाले जे असे प्रश्‍न उपस्थित करतात त्यांनी देशात राहू नये. स्वतःच्या प्राणाची बाजी लावून जवान देशाचे रक्षण करीत असतात. त्यांच्याबद्दल हे लोक महाराष्ट्राचा काय संबंध आहे असे विचारतात लाच वाटायला पाहिजे त्यांना.

एका वृत्तवाहिनील दिलेल्या मुलाखती प्रसंगी उदयनराजे बोलत होते. ते म्हणाले आपले जवान आहेत म्हणून देश सुरक्षित आहे. कधी तुम्ही त्यांच्या कुटुंबात डोकावून पाहिले आहे का ? जी तरुण मुले शहीद होतात. ही मुले कोणाचे तरी वडील असतात, कोणाचे तरी पती असतात. या कुटुंबाची होणारी वाताहत मी पाहिली आहे. 370 कलम रद्द झाल्याने देशात शांतता नांदत आहे. आमची मुले सुखरुप आहेत.

गड किल्ल्यांबाबत आपल्या वक्तव्यास वेगळा अँगल दिल्याचे उदयनराजेंनी स्पष्ट केले. ते म्हणाले गड किल्ले भाड्याने द्यायचे कोणी सांगितले, अहो माझ्या वक्तव्यास वेगळा अँगल दिला गेला. मी म्हणालो प्रत्येक गड किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांधला तो विशिष्ट उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेऊन बांधला. त्या किल्ल्यांचा जिर्णोद्धार, देखरेख झालीच पाहिजे. त्यासाठी निधीची आवश्‍यकता आहे. गड - किल्ल्यांवर टूरिझम क्‍लस्टर झाले पाहिजे. रोप वे झाले पाहिजेत. मग ज्येष्ठ नागरीकांना सोयीचे होईल. देश - परदेशातील लोक मोठ्या प्रमाणात येतील.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या किल्ल्यांवरील मंदिर म्हणजे शिव मंदिर आहेत. पुर्वी जे गडावर रहायाचे आणि आजही जे राहतात. ते तेथेच आजही साध्या पद्धतीने मंदिरात लग्न करतात. पण माझ्या बोलण्याला वेगळा अँगल दिला गेला. काय म्हणे तर आता किल्ल्यांवर बॅंडबाजा वाजणार.

सरकारचा प्रस्ताव होता मोठ मोठ्यांसाठी किल्ले लग्न समारंभासाठी दिले पाहिजेत यावर तुमचे काय मत आहे. हे पहा टूरिझम ऍक्‍टीव्हीटी वाढली पाहिजे या मताचा मी आहे. किल्ले विकसीत करणे ही सर्वांची जबाबदारी आहे. पण मी कोठे म्हणतोय तेथे हॉटेल, बार झाले पाहिजेत. सरकारचा तसा प्रस्ताव असेल तर माझाच काय सगळ्यांचा विरोध असला पाहिजे.

उद्या पंतप्रधान नरेंद्र मोंदी साताऱ्यात येत आहेत. त्यांची सभा होत आहे. काय भेट देणार आहात त्यांना ?

उदयनराजे म्हणाले शाहूनगरीच्यावतीने त्यांचे शाही स्वागत करु. त्यांना पुर्वीची एक तलावर, आमचे राजघराण्याचे प्रतीक राजमुद्रा तसेच मेघडंबरीमधील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा देणार आहोत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ... then they should not stay in the country says Udayanraje Bhonsle