थंडा थंडा...कूल कूल...! 

मोहन काळे
बुधवार, 15 मार्च 2017

रोपळे बुद्रूक - रोपळे (ता. पंढरपूर) व परिसरातील बहुतांश ग्रामस्थांनी पक्ष्यांना थंड पाणी मिळावे म्हणून खास माठाच्या भांड्यात पाणी ठेवले आहे. त्यामुळे विविध प्रकारच्या पक्ष्यांसाठी थंडा थंडा...कूल कूल...! पाणपोया उन्हाळ्यात वरदान ठरल्या आहेत. 

रोपळे बुद्रूक - रोपळे (ता. पंढरपूर) व परिसरातील बहुतांश ग्रामस्थांनी पक्ष्यांना थंड पाणी मिळावे म्हणून खास माठाच्या भांड्यात पाणी ठेवले आहे. त्यामुळे विविध प्रकारच्या पक्ष्यांसाठी थंडा थंडा...कूल कूल...! पाणपोया उन्हाळ्यात वरदान ठरल्या आहेत. 

अलीकडच्या काळात पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे पक्ष्यांचे नैसर्गिक पाणवठे कोरडे पडले आहेत. त्यामुळे विविध प्रकारच्या पक्ष्यांना उन्हाळ्यात पाण्याच्या शोधात स्थलांतर करावे लागते. उन्हाळ्यात पाणीच न मिळाल्यामुळे पक्ष्यांचा तडफडून मृत्यू होत असल्याच्या घटना घडत असतात. पक्षी संवर्धनाबद्दल "सकाळ'ने आजवर बरीचशी जनजागृती केली आहे. त्यामुळे यंदा उन्हाळ्याच्या सुरवातीलाच विविध भागात बहुतांश लोकांनी पक्ष्यांसाठी पाणपोया सुरू केल्या आहेत. या पाणपोयांना पक्ष्यांचा चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. या पाणपोयांवर आता पक्षी पाणी पिण्यासाठी येत असल्याचे दिसत आहे. सकाळी व सायंकाळच्या सुमारास या पाणपोयांवर पाणी पिण्यासाठी पक्ष्यांची विशेष गर्दी होत आहे. त्यामुळे पक्ष्यांना आपल्या घरासमोर, घराच्या गच्चीवर व शेतात सुद्धा अजूनही पिण्याच्या पाण्याची गरज आहे. पक्षी संवर्धनासाठी विशेष दिवस साजरा करण्यापेक्षा पाणपोया किंवा त्यांना अन्नाची सोय केली तर त्यांचे रोजच संवर्धन होईल. याच भावनेतून रोपळे व परिसरातील अनेकांनी पक्ष्यांना अन्न व पाण्याची व्यवस्था केली आहे. 

"सकाळ'ने पक्षी संवर्धनाबद्दल नेहमीच जनजागृती केली आहे. त्यामुळेच आम्ही पक्ष्यांना अन्न व पाण्याची व्यवस्था केली आहे. 
- समीर साळवी, ग्रामस्थ, रोपळे बुद्रूक, ता. पंढरपूर 

उन्हाळ्यात पक्ष्यांनाही पिण्यासाठी थंड पाणी मिळावे म्हणून आम्ही माठाच्या भांड्यात पाणी ठेवतोय. परंतु, त्यांचे आरोग्य चांगले राहावे म्हणून त्या भांड्यात आम्ही ऍरोचे पाणी भरून ठेवत आहे. पाण्याची व्यवस्था केल्यामुळे आमच्या पाणपोईवर आता पक्ष्यांची संख्या वाढली आहे. 
- पोपट भोसले, शेतकरी, रोपळे बुद्रूक, ता. पंढरपूर 

Web Title: water for bird