करिअरसाठी भाषांतर क्षेत्राचा पर्याय खुला

गौतमी औंढेकर - सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 सप्टेंबर 2016

पुणे - केवळ भाषेची आवड असणाऱ्यांना करिअर नाही, या पारंपरिक कल्पनेला छेद देणाऱ्या व्यावसायिक भाषांतर क्षेत्राला व्यापक रूप प्राप्त होताना दिसत आहे. गेल्या काही वर्षांपर्यंत सर्वसामान्यांमध्ये या क्षेत्राविषयी फारशी माहिती नव्हती. पण आता चित्र बदलत आहे. अनेक तरुणांचा एखादी परकीय भाषा शिकण्याकडे ओढा वाढत आहे. त्याचप्रमाणे, उद्योगांकडून विविध भाषांमध्ये अनुवाद करणाऱ्यांची मागणी वाढत आहे. जगभरातील भाषांतर उद्योगाची उलाढाल ही साधारणपणे ते 36 ते 42 अब्ज डॉलरदरम्यान असल्याचा जाणकारांचा अंदाज आहे. 

पुणे - केवळ भाषेची आवड असणाऱ्यांना करिअर नाही, या पारंपरिक कल्पनेला छेद देणाऱ्या व्यावसायिक भाषांतर क्षेत्राला व्यापक रूप प्राप्त होताना दिसत आहे. गेल्या काही वर्षांपर्यंत सर्वसामान्यांमध्ये या क्षेत्राविषयी फारशी माहिती नव्हती. पण आता चित्र बदलत आहे. अनेक तरुणांचा एखादी परकीय भाषा शिकण्याकडे ओढा वाढत आहे. त्याचप्रमाणे, उद्योगांकडून विविध भाषांमध्ये अनुवाद करणाऱ्यांची मागणी वाढत आहे. जगभरातील भाषांतर उद्योगाची उलाढाल ही साधारणपणे ते 36 ते 42 अब्ज डॉलरदरम्यान असल्याचा जाणकारांचा अंदाज आहे. 

आतापर्यंत परकीय भाषांमधून इंग्रजीमध्ये भाषांतराचा प्रचलित कल होता. परंतु आता भारतीय भाषांमधील अनुवादालाही तेवढेच महत्त्व आले आहे. बहुतांश उद्योगांना, विशेषतः "ई-कॉमर्स‘ कंपन्यांना शहरी बाजारपेठांपलीकडे जाऊन व्यवसाय विस्तार करण्यासाठी प्रादेशिक भाषांशिवाय गत्यंतर नाही. त्यामुळे अनेक कंपन्या याकडे वळताना दिसत आहेत. सध्या अनेक जण या क्षेत्राकडे उत्पन्नाचा अतिरिक्त स्रोत म्हणून पाहतात. परंतु तुमच्याकडे आवश्‍यक कौशल्ये असल्यास अनुवाद करणे हाच मुख्य व्यवसाय करता येऊ शकतो. त्यातून दर महिन्याला साधारणपणे तीस हजारांपासून ते दीड लाखांपर्यंत निव्वळ उत्पन्न मिळविणे शक्‍य आहे. 

‘व्यावसायिक अनुवादक म्हणून काम करण्यासाठी इंग्रजी, परकीय भाषा आणि मातृभाषेचे ज्ञान ही सर्वात पहिली व प्राथमिक पायरी आहे. भाषेसोबतच आपल्याला तंत्रज्ञानाशी निगडित एखादा अभ्यासक्रम करणे आवश्‍यक आहे. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे चांगला अनुवादक होण्यासाठी तुमच्याकडे चांगली निरीक्षणशक्ती असणे गरजेचे आहे. भाषांतर करताना प्रत्येक शब्दाच्या छटा माहीत असल्या पाहिजेत,‘‘ असे मत बिट्‌स संस्थेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संदीप नूलकर यांनी व्यक्त केले. 

सर्वोत्कृष्ट व्यावसायिक अनुवादकाचा पुरस्कार नुकताच प्राप्त झालेल्या ललिता मराठे या क्षेत्राविषयी म्हणाल्या, ‘अजूनही लोकांना या क्षेत्राविषयी तेवढीशी खात्री वाटत नसल्याने त्याकडे लोकांचा ओढा कमी आहे. परंतु या इंटरनेटवरून या क्षेत्रातील उपलब्ध कामाची माहिती इच्छुकांना मिळू शकते.‘‘ 

शिक्षण सांभाळून अनुवादक म्हणून काम करणारी सोनाली कुलकर्णी म्हणाली, ‘सुरवातीला मला इटालियन भाषा शिकण्यात रस होता. परंतु पुण्यात त्याचे अभ्यासक्रम फारसे नसल्याने मी स्पॅनिश आणि फ्रेंच अशा दोन भाषा शिकले. व्यावसायिक अनुवादक म्हणून काम करताना खूप मजा येते. या क्षेत्रात पूर्ण वेळ करिअर करण्याचे मी ठरवले आहे.‘‘ 

जर्मन भाषेतील व्यावसायिक अनुवादक म्हणून काम करणारी तन्वी सरदेसाई म्हणाली, ‘कॉलेजला असताना छंद म्हणून जर्मन भाषा शिकायला सुरवात केली. हे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर यासंबंधीच्या अध्यापनाऐवजी व्यावसायिक क्षेत्राकडे वळण्याचा मी निर्णय घेतला.‘‘ 

अनुवादाच्या क्षेत्रातील संधी 
> आंतरराष्ट्रीय स्तरावर जर्मन, जपानी व फ्रेंच भाषांना सर्वाधिक मागणी 
> भारतीय भाषांमध्ये भारतात हिंदी, राज्याची प्रादेशिक भाषा आणि त्यापाठोपाठ गुजराती/तमीळ 
> भाषेनुसार प्रत्येक शब्दाचा दर एक-सव्वा रुपयापासून ते 10-12 रुपये 
> जगाच्या तुलनेत भारतातील उलाढालीचा आकडा 5 ते 10 टक्के 

Web Title: Career options open to sector Translation