नोटा बंदीचे 'त्या' लोकांना जास्त दुःख- मोदी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 नोव्हेंबर 2016

पुणे - नोटा बंद करण्याच्या निर्णय काही लोकांना आवडणार नाही. ते काहीही म्हणतील. लोक काय म्हणतील मला त्याची पर्वा नाही, असे सांगून काळ्या पैशावरून भ्रष्टाचारी लोकांना चिमटा काढत, या भगीरथ प्रयत्नांसाठी लोकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. 

मांजरी येथील वसंतदादा शुगर इंस्टिट्यूट येथे आंतरराष्ट्रीय साखर परिषदेचे उदघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी केंद्रीय कृषिमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवर नेते उपस्थित होते.

मोदी म्हणाले, "1978 मध्ये मोरारजीभाईंनी एक हजाराची नोट बंद केली होती. मी असा निर्णय बंद करणारा मी पहिला नाही. त्यानंतरच्या एका सरकारने चारआण्याचे नाणे बंद करण्याचा निर्णय घेतला होता. 145 कोटी रुपयांच्या मूल्याच्या नोटा छापल्या होत्या. त्यापैकी 80 कोटी रुपये व्यवहारात होते. त्यातील 35 कोटी बँकेत ठेवीच्या रुपाने होते. फक्त 45 कोटी व्यवहारात होते. सध्या पाचशे आणि हजारच्या नोटांचे मूल्य 14 लाख कोटी एवढे आहे. त्यामुळे त्याचा फायदा शत्रू देश, समाजकंटक आणि भ्रष्टाचारी लोक घेत होते. त्यामुळे हा निर्णय घेणे आवश्यक होते."

शेतीविषयी बोलताना मोदी यांनी सांगितले की, ज्याप्रमाणे अलीकडच्या काळात वैद्यकीय क्षेत्र पूर्णपणे तंत्रज्ञानावर आधारित आहे. त्याचप्रमाणे शेतीही पूर्णपणे तंत्रज्ञानाधिष्ठित होईल. ते दिवस दूर नाहीत, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. 

Web Title: currency ban is disturbing for those people- narendra modi