सत्ता संघर्षात ऊस गाळप, पाणी प्रश्‍न अधांतरी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 नोव्हेंबर 2019

- कालवा समितीसह ऊस गाळपाबाबत मंत्री समितीची बैठकच नाही
- गाळप हंगामासह पाण्याच्या नियोजनाचे काय, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.
- दरवर्षी ऑक्‍टोबर महिन्यात होणारी खडकवासला प्रकल्पातील पाण्याच्या नियोजनाबाबत होणारी कालवा सल्लागार समितीची बैठक अद्याप झालेली नाही.

पुणे : राज्यात सुरू असलेल्या सत्ता संघर्षाचे दुष्परिणाम शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना भोगावे लागत आहेत. दरवर्षी ऑक्‍टोबर महिन्यात होणारी खडकवासला प्रकल्पातील पाण्याच्या नियोजनाबाबत होणारी कालवा सल्लागार समितीची बैठक अद्याप झालेली नाही.

साखर कारखान्यांमधील ऊस गाळप हंगाम सुरू करण्याबाबत मंत्री समितीचीही बैठक झालेली नाही. त्यामुळे गाळप हंगामासह पाण्याच्या नियोजनाचे काय, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Due to Power Struggle in Maharashtra Sugarcane sludge, water question is pending