10वी-12वीच्या परीक्षा विद्यार्थ्यांनो आता वापरा डिजी लॉकर कारण...

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 फेब्रुवारी 2020

केंद्र सरकारने 'डिजीटलायझेन'ला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. त्यामध्ये सरकारी कागदपत्राची अधिकृत प्रत म्हणून 'डीजी लॉकर' ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे ही कागदपत्रे सोबत घेऊन फिरण्याची वेळ येत नाही. याचाच वापर परीक्षा मंडळाने करत 'नॅशनल ई गव्हर्नन्स डिव्हिजन'शी करार करूनस गुणपत्रीकांचे डिजीटलायझेशन केले आहे.

पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळाकडून 1989 पासून घेण्यात आलेल्या 10वी व 12वीच्या परीक्षा देणाऱ्या तब्बल साडे आठ कोटी विद्यार्थ्यांचा डेटा 'डीजी लॉकर'मध्ये सेव्ह करून ठेवण्यात आला आहे. तसेच ज्या विद्यार्थांना त्यांची सनद हवी आहे ती 'इ सनद' या पोर्टवरूनल उपलब्ध होऊ शकणार आहे, अशी माहिती मंडळाच्या अध्यक्षा डॉ. शकुंतला काळे यांनी दिली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

केंद्र सरकारने 'डिजीटलायझेन'ला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. त्यामध्ये सरकारी कागदपत्राची अधिकृत प्रत म्हणून 'डीजी लॉकर' ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे ही कागदपत्रे सोबत घेऊन फिरण्याची वेळ येत नाही. याचाच वापर परीक्षा मंडळाने करत 'नॅशनल ई गव्हर्नन्स डिव्हिजन'शी करार करून गुणपत्रिकांचे डिजीटलायझेशन केले आहे.

कॉसमॉस बॅंक सायबर हल्यातील 'एवढी' रक्कम वसूल; पुणे पोलिसांना यश

मंडळाने 1989 पासूनच्या दहावी- बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांची प्रमाणपत्रे या 'डिजी लॉकर' सेव्ह करून ठेवले आहेत. त्यामध्ये 10वीचे 5 कोटी 29 लाख तर बारावीचे 3 कोटी 47 लाख गुणपत्रिका 'डिजीटल' स्वरूपात जतन करून ठेवली आहे. ही प्रमाणपत्रे https://boardmarksheet.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

स्थायी समितीत आता महिलाराज; 'यांना' मिळाली संधी

अनेक विद्यार्थी परदेशात नोकरीसाठी जात असतात, तसचे मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये रूजू होताना कंपन्यांना उमेदवारांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी करणे शक्‍य आहे. याचा वापर करण्यासाठी विद्यार्थ्यांना https://digilocker.gov.in/ या वेबसाइटवर साइन-अप करून आपले आधारकार्ड लिंक करावे लागेल. त्यानंतर त्यांना त्यांचे डिजिटल प्रमाणपत्र उपलब्ध होईल, असे शकुंतला काळे यांनी सांगितले.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Eight crore Student score sheet in the DG Locker