पुण्यासह मध्य महाराष्ट्रात 'रेड अलर्ट' कायम

योगिराज प्रभुणे
बुधवार, 7 ऑगस्ट 2019

- पुण्यासह मध्य महाराष्ट्रात 8 व 9 ऑगस्टला मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली असून 'रेड अलर्ट' कायम राहाणार आहे.
- बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असूनॉ पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवमान खात्याने वर्तविली आहे.
- पुण्यात सकाळ पासूना पावसाला सुरवात संध्याकाळ नंतर पावसाचा जोर वाढणार

पुणे : पुण्यासह मध्य महाराष्ट्रात 8 व 9 ऑगस्टला मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली असून 'रेड अलर्ट' कायम राहाणार आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असूनॉ पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवमान खात्याने वर्तविली आहे.

दरम्यान, बंगालच्या कमी दाबाच्या पट्ट्याचे रुपांतर अतितीव्र कमी दाबाच्या पट्टयात झाले आहे. ओरिसाच्या उत्तर किनारपट्टीपासून हा अतितीव्र कमी दाबाचा पट्टा  65 किमी अतंरावर आहे. 

पुण्यात सकाळ पासूना पावसाला सुरवात संध्याकाळ नंतर पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. पावसाचा जोर वाढल्यास धरणातील विसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Red Alert persisted in central Maharashtra including Pune