उद्घाटनाच्या कार्यक्रमात इमारतीतून गळाले पाणी...

ज्ञानेश सावंत
गुरुवार, 21 जून 2018

मोठा गाजावाजा करत आज पुणे महापालिकेने नवीन इमारतीचा उदघाटन समारंभ आयोजित केला होता. मात्र, पहिल्याच पावसामुळे उदघाटन कार्यक्रम सुरु असतानाच इमारतीमध्ये पाणी गळायला सुरुवात झाली. मुख्यमंत्र्यांचं भाषण सुरू असताना पाणी गळत होते. त्यामुळे महापालिकेच्या कारभारावर प्रशचिन्ह उपस्थित केले जात आहे. आज सकाळी अजित पवार यांनी नवीन इमारतीची पाहणी केल्यानंतर अनेक गोष्टींची पूर्तता न झाल्याने नाराजीही व्यक्त केली होती.

पुणे : मोठा गाजावाजा करत आज पुणे महापालिकेने नवीन इमारतीचा उदघाटन समारंभ आयोजित केला होता. मात्र, पहिल्याच पावसामुळे उदघाटन कार्यक्रम सुरु असतानाच इमारतीमध्ये पाणी गळायला सुरुवात झाली. मुख्यमंत्र्यांचं भाषण सुरू असताना पाणी गळत होते. त्यामुळे महापालिकेच्या कारभारावर प्रशचिन्ह उपस्थित केले जात आहे. आज सकाळी अजित पवार यांनी नवीन इमारतीची पाहणी केल्यानंतर अनेक गोष्टींची पूर्तता न झाल्याने नाराजीही व्यक्त केली होती.

आधीच अर्धवट काम असताना इमारतीच्या उद्घाटनाची घाई केल्याचा आरोप होत असताना भाजपने या कार्यक्रमाच्या निमित्ताने पक्षाचे झेंडे आणि फलकबाजी करून हा भाजपचा इव्हेंट असल्याचे दाखवून दिले आहे. कार्यक्रम सुरु होण्यास काही तास बाकी असताना इमारत आणि परिसरात तयारीची लगबग सुरु आहे. भाजपने देखावा करण्यासाठीच या इमारतीच्या उद्घाटनाचा घाट घातला आहे. Image may contain: 5 people

दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी महापालिकेच्या इमारतीची पाहणी केली आणि इमारतीची कामे अर्धवट असल्याचे म्हटले आहे. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते महापालिकेच्या नव्या इमारतीच्या आज (गुरुवार) होणाऱ्या उदघाटनाच्या कार्यक्रमाचा सत्ताधारी भारतीय जनता पक्षाची "इव्हेंट' करण्याची भूमिका स्पष्ट झाली आहे. या एकाच कार्यक्रमाच्या दोन निमंत्रण पत्रिका छापल्या आहेत. महापालिकेच्या पत्रिकेवर पदाधिकाऱ्यांसह विरोधकांच्या नावांचा उल्लेख आहे. तर, दुसऱ्या पत्रिकेवर मात्र आपल्याच पक्षाच्या काही नेत्यांची नावे छापली आहेत. राष्ट्रपतींच्या कार्यक्रमात राजशिष्टाचाराचा भंग होऊनही महापालिका अर्थात भाजप नेत्यांनी धडा घेतला नसल्याचे दिसत आहे. 
Image may contain: 2 people, people smiling, people sitting and indoor

Web Title: Water leakage from new PMC building inauguration program ...