video: राष्ट्रपतींच्या हस्ते 'कॅट्स' ला 'प्रेसिडेंट कलर'

havai manvandana.jpg
havai manvandana.jpg

नाशिक : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज गुरुवारी (ता.१०) गांधीनगर येथील कॉम्बट आर्मी एव्हीएशनच्या तळावर कॅटला राष्ट्रपतीच्या हस्ते विशेष ध्वज प्रदान (प्रेसिंडेट कलर) गौरविण्यात आले. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, लष्करप्रमुख बिपीन रावत आदींसह विविध लष्करी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत प्रदान झाला. कॅटस्च्या मैदानावर एव्हिएशनच्या वैमानिकांचा गौरव करत त्यांना मार्गदर्शनपर संदेश रामनाथ कोविंद यांनी दिला. यावेळी एव्हिएशनच्या लष्करी बॅन्ड पथकाच्या धूनवर वैमानिकांची तुकडी संचलन करताना दिसली. यासाठी मागील आठवडाभरापासून कॅटस्च्या जवानांकडून सराव केला जात आहे.

प्रेसिडेंट कलरने कॅट्सला ओळख
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते गांधीनगर येथील कॉम्बट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग सेंटर कॅटच्या ध्वज प्रदान (प्रेसिडेंट कलर), धर्मगुरूंच्या उपस्थितीत ध्वजावर विधिवत सर्व धर्मातील धर्मगुरूंच्या हस्ते  पंडित, मौलाना, फादर, गुरुद्वारा प्रबद समिती प्रमुखाकडून पूजा संस्कार झाल्यानंतर कॅट तळाला स्वतःचे ध्वज प्रदान झाले. राज्यपाल भगतसिंग कोशारी, लष्कर प्रमुख बिपीन रावत यांसह विविध लष्करी अधिकारी उपस्थित होते. राष्ट्रपतींनी एका विशिष्ट प्रकारचा ध्वज त्या दलाच्या परेडची मानवंदना घेत प्रदान केला. अशाच पध्दतीचा सर्वोच्च सन्मानाने नाशिकच्या गांधीनगर येथील ‘कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूल’ला (कॅटस्) राष्ट्रपती कोविंद यांच्या हस्ते गौरविण्यात आला.

राष्ट्रपतींच्या आगमनाचे असे होते नियोजन
गांधीनगर येथील कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलला विशेष ध्वज प्रदान करत ‘प्रेसिडेन्ट कलर्स’ पुरस्काराने सन्मानित करण्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे बुधवारी (दि.९) सायंकाळी नाशिक शहरात मुक्कामी आले. ओझरच्या विमानतळावर रामनाथ कोविंद यांचे विमान बुधवारी सायंकाळी उतरले. तेथे विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी सुरज मांढरे, विशेष पालीस महानिरिक्षक छेरिंग दोरजे, पोलीस अधिक्षक डॉ. आरती सिंह यांनी त्यांचे स्वागत केले. तेथून व्हीव्हीआयपी कॅन्वायद्वारे ते मुंबई-आग्रा महामार्गावरून थेट शासकिय विश्रामगृहात दाखल झाले. त्यांच्या आगमनापुर्वीच मंगळवारी या मार्गावर व्हीव्हीआयपी कॅन्वॉयची रंगीत तालीमदेखील घेण्यात आली. या संपुर्ण मार्गावर बॉम्ब शोधक-नाशक व विशेष गुन्हे श्वान पथकाकडून कसून तपासणीदेखील करण्यात आली. गडकरी चौकाकडे जाणारी वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आली. 
 

ध्वज देण्याची जुनी परंपरा
भूदल, वायूदल, नौदल अश तीनही संरक्षण दलाशी संबंधित संस्था व केंद्रांना हा बहुमान त्यांच्या कामगिरीच्याअधारे दिला जातो. ब्रिटीश काळात राणी एलिझाबेथ यांच्या हस्ते लष्करातील विभागाला ध्वज मिळत. स्वातंत्र्यानंतर भारतात भारतीय लष्कराने ही प्रथा कायम ठेवली. देशात लष्कराचे सुप्रीम कमांडर राष्ट्रपतीच्या हस्ते हे ध्वज दिले जातात. त्याला प्रेसिडेंट कलर म्हटले जाते. १ नोव्हेंबर १९८४ ला स्थापन झालेल्या तोपखान्यातील कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन (कॅट) ने ऑपरेशन विजय, मेघदूत यासह अनेक आपत्कालीन स्थितीत सियाचीन सारख्या बर्फाळ व उंच युद्धभूमी व वाळवंटात उपयुक्तकता सिध्द केली.  


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com