विधानसभा निवडणुकीसाठी नाशिकचा ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर आहे 'हा' अभिनेता

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 ऑक्टोबर 2019

मतदाना संबंधी नागरिकांमध्ये जनजागृती अधिक व्हावी तसेच मतदानाचा टक्का वाढावा या उद्देशाने विधानसभा निवडणुकीसाठी नाशिकचा ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर म्हणून अभिनेता चिन्मय उदगीरकर याची निवड करण्यात आली. मतदारांनी निवडणूकप्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन उदगीरकर करणार आहे

 

नाशिक : मतदाना संबंधी नागरिकांमध्ये जनजागृती अधिक व्हावी तसेच मतदानाचा टक्का वाढावा या उद्देशाने विधानसभा निवडणुकीसाठी नाशिकचा ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर म्हणून अभिनेता चिन्मय उदगीरकर याची निवड करण्यात आली. मतदारांनी निवडणूकप्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन उदगीरकर करणार आहे. प्रचारप्रसारच्या मोहिमेतून नाशिकचा ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर म्हणून अभिनेता चिन्मय उदगीरकरचे नाव पुढे आले जिल्ह्यात सध्या सर्वच मतदारसंघांमध्ये जिल्हा प्रशासन जनजागृती मोहिमेवर भर देत आहे.आता अभिनेता चिन्मय मतदारांपर्यंत पोहोचून त्यांना मतदानासाठी आवाहन करताना दिसणार आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपर्यंत अधिकाधिक पोहचण्याचा चिन्मयचा प्रयत्न असून शहरात अनेक ठिकाणी रॅली काढण्यात येणार आहे. मतदानाचा टक्का वाढावा यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत असून सर्वस्तरातून मतदानाची जनजागृती करण्यात येत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: chinmay udgirkar is the brand ambassador of Nashik for the Assembly elections