वेळ नाही बनवायला..रेडीमेड फराळच बरा...

भाग्यश्री गुरव : सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 ऑक्टोबर 2019

दिवाळी म्हटले की कपडे खरेदीपासून तर फराळापर्यंत सगळीकडे महिलावर्गाची धावपळ सुरू असते. वर्षभर फराळाचे विविध पदार्थ मिळत असले तरी, दिवाळीला त्यांचे महत्व अधिक असते. त्यामुळे घरोघरी फराळाचे पदार्थ बनविण्यासाठी महिलावर्गाची लगबग सुरू झाली आहे. तर दुसरीकडे रेडीमेड फराळालाही शहर परीसरात मागणी वाढली आहे. अनारसे, चकली, शंकरपाळे अशा विविध पदार्थांची ग्राहकांकडून मागणी केली जात आहे. 

नाशिक : दिवाळी म्हटले की कपडे खरेदीपासून तर फराळापर्यंत सगळीकडे महिलावर्गाची धावपळ सुरू असते. वर्षभर फराळाचे विविध पदार्थ मिळत असले तरी, दिवाळीला त्यांचे महत्व अधिक असते. त्यामुळे घरोघरी फराळाचे पदार्थ बनविण्यासाठी महिलावर्गाची लगबग सुरू झाली आहे. तर दुसरीकडे रेडीमेड फराळालाही शहर परिसरात मागणी वाढली आहे. अनारसे, चकली, शंकरपाळे अशा विविध पदार्थांची ग्राहकांकडून मागणी केली जाते आहे. 

अनारसे, चकली, शंकरपाळे अशा विविध पदार्थांना मागणी 

शहारातून थेट परदेशात देखील फराळ पाठवले जात आहे. तयार फराळ घेण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे. दिवाळीसाठीचे तयार फराळ घेण्यासाठी बाजारपेठांमध्ये ग्राहकांची गर्दी होत आहे. काही महिलांना नोकरीनिमित्त किंवा काही कामाच्या व्यापामुळे फराळाचे बनविण्यासाठी वेळ मिळत नाही. अश्‍या महिला तयार फराळाला विशेष पसंती देतात. दिवाळीत या पदार्थांना मोठी मागणी असते. बाजारपेठांमध्ये सध्या चांगलीच गर्दी बघावयास मिळत आहे. अनेक ग्राहक हा फराळ धुळे, नंदुरबार, रत्नागिरी व शहारतील इतर खेडो-पाडी घेऊन जात आहेत. यात चकली, चिवडा, अनारसे, करंजी, शंकरपाळे, चिरोटे, लाडू, फरसाण, शेव यांना मोठा मागणी दिसून आली. 

घरगुती फराळाच्या पदार्थांची बाजारपेठ अशी 
घरगुती फराळाचे पदार्थ साजूक तुपातील बेसन लाडू चारशे तीस रूपये किलो, बटर राईस चकली दोनशे ऐंशी रूपये किलो, रवा लाडू दोनशे सत्तर रूपये किलो, बालूशाही दोनशे ऐंशी रूपये किलो, तसेच ओल्या नारळाच्या कंरजी चारशे रूपये किलो, लसूण चकली तीनशे तीस रूपये किलो, अनारसे साडे तीनशे रूपये किलो दराने व चिवड्याचे विविध प्रकार तर फराळाचे विविध तयार पदार्थ सोशल मिडीयावर उपलब्ध झाले आहे. त्याची चांगलीच विक्री होत आहे. काही महिला घरगुती पद्धतीनेदेखील फराळ बनवून व्यवसाय करत आहेत. 

बाजारपेठेत उपलब्ध फराळाच्या पदार्थांच्या किंमती 
भाजणी चकली-------------360रूपये किलो 
अनारसे-------------------360 रूपये किलो 
करंजी--------------------360 रूपये किलो 
शंकरपाळे-----------------240 रूपये किलो 
भाजके पोहे चिवडा---------220 रूपये किलो 
रवा लाडू------------------200 रूपये किलो 
बेसन लाडू----------------300 रूपये किलो 
साटोरी-------------------360 रूपये किलो 
चिरोटी-------------------280 रूपये किलो 
फरसाण------------------200 रूपये किलो 

यंदा दरवर्षीच्या तुलनेत तयार फराळाला मागणी वाढली आहे. ग्राहक गावालादेखील आमच्या येथील फराळ घेऊन जातात. अनारसे, चकली, शंकरपाळे, चिरोटी आवर्जून खरेदी केले जात आहेत. - मंगला अष्टपुत्रे, विक्रेते.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Citizens' tendency towards ready made diwali snack