'सिटू'तर्फे 'इतक्या' कंपन्या मध्ये बोनस जाहीर...

सतीश निकुंभ : सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 ऑक्टोबर 2019

सातपूर अंबडसह जिल्यातील औद्योगिक क्षेत्रात सिटू (सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स) कामगार संघटनेतर्फे दोनशे पेक्षा जास्त कंपन्यांमध्ये बोनसची यशस्वी बोलणी झाली आसून त्यात ८.३३ पासून ते ३० टक्के बोनस हा कामगारांना पगार व्यतिरिक्त मिळणार आहे. यामध्ये किमान वीस कोटी पेक्षा जास्त उलाढाल होणार आहे. यामुळे बाजारात खरेदी वाढण्यास ख-या अर्थाने मदत होणार आसल्याचा दावा सिटू संघटने तर्फे करण्यात आला. 

नाशिक : सातपूर अंबडसह जिल्यातील औद्योगिक क्षेत्रात सिटू (सेंटर फॉर इंडियन ट्रेड युनियन्स) कामगार संघटनेतर्फे दोनशे पेक्षा जास्त कंपन्यांमध्ये बोनसची यशस्वी बोलणी झाली आसून त्यात ८.३३ पासून ते ३० टक्के बोनस हा कामगारांना पगार व्यतिरिक्त मिळणार आहे. यामध्ये किमान वीस कोटी पेक्षा जास्त उलाढाल होणार आहे. यामुळे बाजारात खरेदी वाढण्यास ख-या अर्थाने मदत होणार आसल्याचा दावा सिटू संघटने तर्फे करण्यात आला. 

छोट्या मोठ्या उद्योगात काम करणा-यांनाही बोनस

दरम्यान व्यापार व व्यावसायिक हे दरवर्षी दसरा दिवाळीची वाट पाहत आसतात. कारण जिल्यातील सातपूर,अंबड, सिन्नर, दिडोरी, वाडीव-हे, गोंदे., येवला, विंचूर आदी भागातील औद्योगिक वसाहतींमधील छोट्या मोठ्या उद्योगात काम करणा-या अधिकारी, कर्मचारी, कामगार यांना बोनस मिळत असल्याने पगारा व्यतिरिक्त दोन पैसे मिळाल्यामुळे बाजारही फुलून जातात. 

मंदीमुळे कामगार मिळेल तो बोनस पदरात पाडून घेण्याची पाहताएत वाट 
यंदा काहीसा मंदीच्या वातावरणामुळे ऑटोमोबाईल क्षेत्रातील काही छोट्या कंपन्या वगळता इतर सर्वच कंपनी व्यवस्थापनाने आपल्या यथाशक्ती प्रमाणे आपल्या कामगारांना बोनस जाहीर केल्याचे पाहायला मिळाले. मंदीमुळे कंत्राटी व ठेकेदार हजारो कामगार ना आपला रोजगार गमवावा लागला असला तरी इतर महीने काम केल्याने जे मिळेल तो बोनस पदरात पाडून घेण्याची वाट पाहत आहे.

वीस कोटी पेक्षा जास्त उलाढाल होण्याचा दावा  

सिटूतर्फे या कंपन्याचे बोनस कराराची बोलणी यशस्वी झाली आहे . सिप्रा युनिट - २-२० %., इंडियन वॉल - २६%, आनंद आय पावर २२ हजार, टीडीके इपकॉस - ३० %, गोल्डी - २२ हजार, एम.जी.इंडस्ट्रीज - १८ हजार ३००, शरिन अॅटोमोबाईल- २२ हजार. चैतन्य फार्मा - १६%, सागर इंजिनिअर ११ हजार ५००, शोमेश फोर्जिग - १३.५०%, ओके टुल - १५ हजार, सुमो अॅटोमोबाईल - ११ हजार ४००,अल्फ इंजिनिअरिंग - १६%, आर्ट रबर - १०%, फिनोटेक्स फायर - २०%, एम्पायर स्पायसेस -११%, सुदाल इंडस्ट्रीज - ११ हजार ४००, अॅडम फ्रेब्रिवर्कस - २०%, नोवितार लिग्रांड - २०%, झायलॉग प्लास्टो २०%, नाशिक स्टील - १२ हजार, एम.आय.सी.- १६% यांसह किमान पावने दोनशे कंपन्यांमध्ये सिटूचे नेते डॉ. डि. एल. कराड, सिताराम ठोमंरे,अॅड.आर.एस.पांडे, संतोष काकडे, तुकाराम सोनजे आदींनी परिश्रम घेऊन यशस्वी चर्चा केली आहे टप्प्या टप्प्यात बोनस दिवाळी पुर्वी पगार व बोनस कामगारांच्या खात्यात जमा केली जाणार आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 'CITU' Association announces bonuses to hundreds of companies.