Video : ऐकावे ते नवलच! कोब्रा सापाने हे काय खाल्ले?

भाऊसाहेब गोसावी : सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 ऑक्टोबर 2019

साामान्यपणे सापांना बेडूक आणि उंदीर खाताना आपण पाहिले किंवा ऐकले असेल. मात्र मनमाड शहराच्या काही अंतरावर चांदवड तालुक्यातील दहेगाव शिवारात सायगोल फॅक्टरी समोर असलेल्या कांदा व्यापा-याच्या कांद्याच्या खळ्यात पकडण्यात आलेल्या भारतीय कोब्रा जातीच्या सापाने चक्क कांदा खाल्ल्याचे निदर्शनास आले. या कांद्यामुळे त्याचा जीव देखील धोक्यात आला होता.

मनमाड : साामान्यपणे सापांना बेडूक आणि उंदीर खाताना आपण पाहिले किंवा ऐकले असेल. मात्र मनमाड शहराच्या काही अंतरावर चांदवड तालुक्यातील दहेगाव शिवारात सायगोल फॅक्टरी समोर असलेल्या कांदा व्यापा-याच्या कांद्याच्या खळ्यात पकडण्यात आलेल्या भारतीय कोब्रा जातीच्या सापाने चक्क कांदा खाल्ल्याचे निदर्शनास आले. या कांद्यामुळे त्याचा जीव देखील धोक्यात आला होता.

सापाने कांदा खाल्लाने आश्चर्य

चांदवड तालुक्यातील दहेगाव येथील पप्पू रांका यांच्या कांद्याच्या खळ्यात नेहमी प्रमाणे कांदे भरायचे काम चालू होते काम करत असताना चार वाजेच्या सुमारास खळ्यामध्ये कांद्याची चाळीत तारी मध्ये अडकलेल्या अवस्थेत एक भला मोठा साप एका कामगारांच्या निदर्शनात आला आणि सगळे कामगार घाबरले. कामगारांनी याबाबत व्यापारी पप्पू रांका मालक यांना सांगून सर्पमित्र विजय उगले सलीम शेख यांना बोलावले ते तात्काळ वेळेवर पोहचले आणि हे सापाचे पोट तारीमध्ये अडकलेले दिसले. त्यावेळी सापाचे पोट खूप फुगलेले दिसले आणि त्यांनी ते बाहेर काढले तर बघितले, सापाने एक मोठा बेडूक आणि कांदा खालेला दिसला. कोब्रा सापाचे खाद्य उंदीर किंवा बेडूक. पण  साप कांदा कसा खाऊ शकतो हे बघून सर्वच चकित झाले. सापने भक्ष गिळता गिळता कांदा पण गिळला असेल. असा अंदाज सर्वांनी लावला.  हे जर बाहेर काढले नसते तर सापाला खूप त्रास झाला असता अशी माहिती सर्पमित्राने दिली. यावेळी स्थानिक लोक व वनविभागाच्या मदतीने या सापाला जंगलात सोडण्यात आले

.मी अद्याप पंधरा वर्षापासून सापांना पकडून जीवदान दिले. परंतु अद्याप आता पर्यंत कोब्रा सापानं कांदा गिळला मी पहिल्यांदा बघीतले.मला वेळेवर बोलवून कोब्रा सापाच्या शरीरातील कांदा  व बेडूक बाहेर काढून जीवदान दिऊन प्राण वाचविले तसेच वनविभाग स्वाधीन केले.- विजय उगले (सर्पमित्र,मनमाड)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cobra eats onion