मोबाईल, गेम हिरावतोय लहानग्यांची दृष्टी!

मोबाईल, गेम हिरावतोय लहानग्यांची दृष्टी!

धुळे - सुरवातीला संवाद माध्यमातील क्रांती वाटणारा मोबाईल कधी ‘फोर जी’वर गेला अन्‌ मुले त्याच्या आहारी गेली, हे आता आपल्यालाही कळले नाही. शहरी असो वा मध्यमवर्गीय कुटुंबात सहज वावरणारा हा मोबाईल तुमच्या लहानग्यांची दृष्टी हळूहळू हिरावून घेत आहे. क्षणभर विश्‍वास बसणार नाही, पण हे सत्य आहे आणि ते वर्षभराच्या अथक प्रयत्नांनी निष्कर्षासह मांडले आहे येथील नेत्रतज्ज्ञ डॉ. मुकर्रम खान यांनी. त्यांचे हे संशोधन लवकरच ते आंतरराष्ट्रीय परिषदेत मांडणार आहेत.

डॉ. मुकर्रम खान येथील निष्णात नेत्रशल्यविशारद असून, त्यांनी डोळ्यांच्या अत्यंत गुंतागुंतीच्या शस्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण करून अनेकांना दृष्टी मिळवून दिली आहे. मोबाईलचे वाढते वेड अन्‌ त्याचा ‘टीन एजर्स’वर होणारा परिणाम याविषयी चिंतित असलेल्या डॉ. खान यांनी याबाबत जनजागृतीसाठी वर्षभरापूर्वी एक प्रकल्प हाती घेतला. त्यानुसार त्यांनी मोबाईल अन्‌ टीव्ही असलेली शंभर कुटुंबे अन्‌ नसलेली खेड्यातील शंभर कुटुंबे निवडली. निवडीपूर्वी त्यांची नेत्रतपासणी करण्यात आली. त्या वेळच्या नोंदी आणि स्थितीसह पुढील अभ्यासाला सुरवात झाली. या प्रत्येक कुटुंबात किमान दोन मुले होती. या मुलांच्या सवयी, मोबाईलवर गेम पाहणे, टीव्ही पाहणे, मोबाईल हाताळण्याच्या पद्धती आणि झोपेची वेळ अशा बाबींवर नोंदी घेत संशोधन सुरू झाले. दुसरीकडे मोबाईल अन्‌ टीव्ही नसलेल्या मुलांवरही असाच प्रयोग सुरू झाला.

अन्यथा चाळिशीतच मोतीबिंदू होईल
डॉ. खान यांनी केलेले हे संशोधन त्यांनी देशातील नेत्रशल्यचिकित्सकांच्या परिषदांमध्ये नुकतेच सादर केले. आता ते आंतरराष्ट्रीय परिषदेत सादर करणार आहेत. नेत्रचिकित्सकांच्या अनेक आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सहभागी झालेल्या डॉ. खान मोबाईल व गेमिंगच्या अतिरेकाबाबत पालकांमध्ये जनजागृती करीत आहेत. डोळा हा शरीराचा अतिशय महत्त्वाचा अवयव आहे. तो जपण्यासाठी आपणच मुलांची काळजी घेतली पाहिजे, अन्यथा साठी-सत्तरीत येणारा मोतीबिंदू या पिढीला पस्तिशी-चाळिशीतही येऊ शकेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

धक्कादायक बदल समोर
वर्षभराचा अभ्यास अन्‌ नोंदीनंतर समोर आलेले सत्य अतिशय धक्कादायक आहे. मोबाईल न हाताळणाऱ्या अन्‌ टीव्ही नसलेल्या शंभर कुटुंबांतील केवळ सात टक्के मुलांमध्ये दृष्टिदोष आढळला असून, त्यात चार टक्के हा आनुवंशिक आहे. याचा अर्थ शंभरातील केवळ अकरा मुलांमध्येच दृष्टिदोष आढळला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com