'चाय पे चर्चे' ला चढला इलेक्शन फिव्हर

योगेश बच्छाव : सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 ऑक्टोबर 2019

 येत्या आठ दिवसावर विधानसभेचे मतदान होणार आहे. शहराला यंत्रमागाचे शहर म्हणून सर्व दूर प्रसिद्धी मिळाली आहे. तर कामगारांचे शहर असल्यामुळे येथे सर्व व्यवहार महत्वाच्या घडामोडींची चर्चा ही चहाच्या टपरीवर होत असते. मालेगाव शहर चहा शौकीनांचे शहर म्हणून गणले जात असतांनाच शहरात सुरु असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीची चर्चा देखील चहाच्या टपरीवरचा रंगत आहे. काहींनी तर 'चाय पे चर्चा लाच एक्झिट पोल धागेदोरे बांधायला सुरुवात केली आहे.

मालेगाव :  येत्या आठ दिवसावर विधानसभेचे मतदान होणार आहे. शहराला यंत्रमागाचे शहर म्हणून सर्व दूर प्रसिद्धी मिळाली आहे. तर कामगारांचे शहर असल्यामुळे येथे सर्व व्यवहार महत्वाच्या घडामोडींची चर्चा ही चहाच्या टपरीवर होत असते. मालेगाव शहर चहा शौकीनांचे शहर म्हणून गणले जात असतांनाच शहरात सुरु असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीची चर्चा देखील चहाच्या टपरीवरचा रंगत आहे. काहींनी तर 'चाय पे चर्चा लाच एक्झिट पोल धागेदोरे बांधायला सुरुवात केली आहे.

सायंकाळी उशीरापर्यंत चहाच्या टपरीवर रंगतोय राजकीय गप्पांचा फड 
ऑक्टोंबर हिट असल्यामुळे दुपारच्या रणरणत्या उन्हात उमेदवारांचा व कार्यकर्त्यांचा प्रचाराला कस लागत आहे. प्रत्येक जण आपापल्या प्रभागात जोरदार प्रचार करीत आहेत. मालेगाव मध्य मतदारसंघात मुस्लिम बहुल परिसरासह कामगार वस्ती अधिक असल्याने या ठिकाणी दररोज सायंकाळी उशीरापर्यंत प्रत्येक चहाच्या टपरीवर राजकीय गप्पांचा फड रंगत आहे. रात्रभर जागणारे शहर असल्यामुळे यंत्रमाग कामगारांच्या गप्पा देखील राजकीय स्वरुपाच्या होवू लागल्या आहेत. ज्याप्रमाणे चाय पे चर्चा वर एक्झिट पोल बांधाबांध सुरु देखील टपऱ्यांवर बसुन चाय पितानाच असते. त्याचप्रमाणे मालेगाव शहरात निवडणुकीचा एक्झिट पोल वर्तविला जात आहे. 

अनेकांच्या जय- पराजयाचे तर्क वितर्क
मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार आमदार आसिफ शेख, एमआयएमचे उमेदवार मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांच्यात लढत होत आहे. याच पक्ष व उमेदवारांची नियमित चर्चा असते. तर यंदा भाजपने मालेगाव संगमेश्वर भागातील नगरसेविका दिपाली वारुळे यांना मालेगाव मध्य भागातील उमेदवारी दिल्याने यावेळच्या निवडणुकीकडे सर्वार्थाने जिल्हावासीयांचे लक्ष लागून आहे. येत्या आठ दिवसात चाय पे चर्चा मध्ये अनेकांच्या जय- पराजयाचे तर्क वितर्क लावले जाणार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Discussion of elections on the tea stall