दिवाळीसाठी बाजारपेठा फुलल्या ; 'बॉलीवूड' स्टाईल कपड्यांचा बोलबाला

किशोरी वाघ : सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 ऑक्टोबर 2019

नाशिक शहरात सण-उत्सवामुळे एक वेगळाच उत्साह महिलावर्गात बघायला मिळतो. महिलावर्गाला खास नटण्या- मुरडण्याची हौस असल्यामुळे दिवाळीसाठी कपडे, ज्वेलरी, फॅन्सी बॅग, गृहोपयोगी शोभेच्या वस्तू यांच्या खरेदीसाठी बाजारात लगबग सुरु आहे.

नाशिक : शहरात सण-उत्सवामुळे एक वेगळाच उत्साह महिलावर्गात बघायला मिळतो. महिलावर्गाला खास नटण्या- मुरडण्याची हौस असल्यामुळे दिवाळीसाठी कपडे, ज्वेलरी, फॅन्सी बॅग, गृहोपयोगी शोभेच्या वस्तू यांच्या खरेदीसाठी बाजारात लगबग सुरु आहे.

 यंदा पदमावत, कलंक, बॉलिवुड पॅटर्नची खास चलती 

अवघ्या पंधरा दिवसांवर येऊन ठेपलेल्या दिवाळीसाठी कपड्यांच्या नाविन्यपूर्ण पद्धती व प्रकार बाजारात उपलब्ध असल्याने महिलावर्गात विशेष उत्साह ओसंडून वाहत आहे. परंतू, यावर्षी महागाईमुळे कपडे व इतर वस्तूंच्या किंमती वाढल्याने काहीशा प्रमाणात नाराज आहे. असं म्हटले जाते, की दिवाळी सण मोठा नाही आनंदाला तोटा याप्रमाणे किंमती जरी जास्त असल्या तरीही खरेदीसाठी ग्राहकांची बाजारात रेलचेल सुरु झाली आहे. विविध कपड्यांच्या दुकानांत दिली जाणारी खरेदीवरील सूट व गिफ्ट हॅम्परमुळे महिलावर्ग बाजारपेठात गर्दी करु लागला आहे. महिलावर्गासाठी खास सॉफ्ट सिल्क, डिझायनर साड्या, रॉ सिल्क, काठपदर, पैठणी यात विविध आकर्षक रंगसंगतीमध्ये साड्या उपलब्ध असून त्यांच्या किंमती तीनशे ते तीस हजारांपर्यंत उपलब्ध आहेत. तसेच, विविध डिझायनर महिला व तरुणींसाठी खास यावर्षी पदमावत पॅटर्न, कलंक पॅटर्न,पंखुडी पॅटर्न, नीता अंबानी वेडींग पॅटर्न, इन्डो-वेस्टर्न पॅटर्न हे 2 हजारांपासून ते 4 हजारांपर्यंत उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे, स्वस्तात रेग्युलर वापरासाठी कॉलेज तरुणींची क्रॉप टॉप व प्लाझोसाठी विशेष उत्साह दिसून येत आहे. 

अशा आहेत किंमती 
डिझायनर प्लाझो ---- 950 ते 3000 
वन पिस ---- 750 ते 6000 
स्कर्ट टॉप ---- 500 ते 2000 
फॅन्सी कुर्ती ---- 150 ते 1000 
ड्रेस मटेरिअल ---- 250 ते 3000 

प्रतिक्रिया
यावर्षी बांधणी, ब्रासो, सिल्क, डिझायनर फ्रिल साड्या, काठपदर साड्या यांना विशेष मागणी आहे. दिवाळीला अवकाश असला तरी मात्र खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी सुरु आहे. - नरेश पारख, साड्या विक्रेता


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Diwali festival Markets are full of different style of clothes