'यंदा कर्तव्य आहे' सोशल मीडियावर व्हायरल 

invi 2.jpg
invi 2.jpg

अंदरसुल  : सध्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सर्वत्र निवडणुकीचा फड रंगू लागल्याने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत'यंदा कर्तव्य आहे' या आशयाची निवडणूक निमंत्रण पत्रिकाच थेट सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याने सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे.

पत्रिकेच्या माध्यमातून मतदारांना मतदान करण्याची विनंती

जणू काही लग्न पत्रकपत्रिकेच्या नमुन्यानुसार तयार केलेल्या मजकुरात सुरुवातीला निवडणूक आयुक्त प्रसन्न म्हणून पत्रिकेची सुरुवात केली आहे.विशेष म्हणजे यंदा कर्तव्य आहे ही पत्रिकेची सुरुवात करून मतदारांना मतदान करण्याची विनंती केली आहे.सप्रेम नमस्कार विनंती विशेष भारत मातेचे सुपुत्र चिरंजीव मतदार आणि आपली सर्वांची लाडकी लोकशाही या मंगलप्रसंगी आपले बहुमूल्य मतदान करून निवडणूक कार्यक्रमाची शोभा वाढवावी आग्रहाची विनंती मतदार राजाला केली आहे. 21 ऑक्टोबर 2019 ला मतदानाच्या दिवशी मुहूर्त काढला असून स्थळ मतदान केंद्र आहे.या आशयाचा मजकूर अगदी लग्नपत्रिका प्रमाणेच तयार केल्याने यंदा कर्तव्य बजवायचे आहे ही निमंत्रण पत्रिका सर्वत्र सोशल मीडियाच्या व्हाट्सउप ग्रुपवर व्हायरल होत असून एक प्रकारे मतदान करण्याची जन जागृती केली जात आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com