Vidhan Sabha 2019 : सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतक-यांच्या आत्महत्या सुरूच - अमोल मिटकरी

amol mitkari.jpg
amol mitkari.jpg

सिन्नर : मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे महाराष्ट्रात शेतकरी अजुनही आत्महत्या करताहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला सत्ता द्या तीन महिन्याच्या आत सरसकट कर्ज माफी देऊ असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी केले.राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचारसभेत ते सिन्नरला बोलत होते.व्यासपीठावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील,माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ,कोंडाजीमामा आव्हाड,आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना मिटकरी यांनी अमित शहा याःनी शिवसेनेच्या पदरी सर्व पडणाऱ्या जागा दिल्या. यावेळी भुजबळ म्हणाले,आमच्या सरकारने एका झटक्यात ७० हजार कोटींचे कर्ज माफ केले होते.कोल्हापूर सांगली पूरात आडकले असताना मुख्यमंत्री मात्र महाजनादेश रॅलीत मग्न असल्याची टिका करत अलमट्टी धरणाचे दरवाजे कर्नाटक सरकारला उघडायला सांगितले असते तर पुराची परिस्थिती आलीच नसती.आत्महत्येत,बेरोजगारीत,गुन्हेगारीत महाराष्ट्र पहीला आहे.शरद पवारांवर ईडीची कारवाई करणाऱ्या सरकारला आता गाडायची वेळ आली आसल्याचेही ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com