Video : एचएएल कर्मचा-यांचा देशव्यापी बेमुदत संप

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 ऑक्टोबर 2019

देशभरातील एचएएल कर्मचारी आजपासून (ता.१४) बेमुदत संपावर
गेले आहेत. एकूण ९ प्रभागातील जवळपास २० हजार कर्मचारी आपल्या वेतनवाढीसंदर्भात गेली कित्येक महिने आंदोलन करत आहे. दोन दिवसांपूर्वी बंगलौर येथे झालेल्या बैठकीची बोलणी फिस्कटली असून समाधानकारक प्रस्ताव न दिल्याने अखिल भारतीय एचएएल कामगार ट्रेड यूनियन समितीच्या वतीने बैठकीचा त्याग केला आहे. कामगारांनी भजन म्हणून व्यवस्थापनाला जागे करण्यांचा प्रयत्न केला व्यवस्थापनाने 'आहे ती ऑफर ही काढून घेऊ' तुमच्या बदल्या करू असा सज्जड दम दिला आहे प्रतिक्रियेसाठी एकही प्रशासन अधिकारी आला नाही 

ओझर  : देशभरातील एचएएल कर्मचारी आजपासून (ता.१४) बेमुदत संपावर
गेले आहेत. एकूण ९ प्रभागातील जवळपास २० हजार कर्मचारी आपल्या वेतनवाढीसंदर्भात गेली कित्येक महिने आंदोलन करत आहे. दोन दिवसांपूर्वी बंगलौर येथे झालेल्या बैठकीची बोलणी फिस्कटली असून समाधानकारक प्रस्ताव न दिल्याने अखिल भारतीय एचएएल कामगार ट्रेड यूनियन समितीच्या वतीने बैठकीचा त्याग केला आहे.व्यवस्थापन कामगार वर्गाची पिळवणूक करत असल्याचे मत समितीने व्यक्त केले आहे. एचएएल कामगारांनी भजन म्हणून व्यवस्थापनाला जागे करण्यांचा प्रयत्न केला व्यवस्थापनाने आहे ती ऑफर ही काढून घेऊ तुमच्या बदल्या करू असा सज्जड दम दिला आहे प्रतिक्रियेसाठी एकही प्रशासन अधिकारी आला नाही 

केवळ अधिकारी वर्ग वाढीव पगारवाढीचा लाभ घेत असून कामगार वंचित

गेली ३४ महीने अधिकारी वर्ग वाढीव पगारवाढीचा लाभ घेत असून फक्त कामगारांना त्यांच्या हक्कांपासून दूर ठेवण्याचे काम एचएएल उच्च व्यवस्थापन करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रलंबित वेतन कराराच्या बोलणी लवकरात लवकर पूर्ण करावी, अधिकारी वर्गाला दिल्याप्रमाणे कामगार वर्गाला हक्काची रास्त वेतन वाढ द्यावी या मागणीसाठी ऑल इंडिया एचएएल को-ऑर्डिनेशन कमिटीच्या माध्यमातून कर्मचारी व्यवस्थापनाशी चर्चा करत आहेत. व्यवस्थापनाने  चांगला वेतन करार देण्याच्या आश्वासन ५ वर्ष मुदतीच्या वेतन कराराची मागणी सोडून सर्व संघटना १० वर्ष मुदतीच्या वेतन कराराच्या बोलणीसाठी तयार झाल्या आहेत. परंतु त्यानंतर ही व्यवस्थापनाने कामगारांची केवळ निराशा केली असून अधिकारी वर्गाला ३५ टक्के इतकी वाढ दिलेली असताना कामगार वर्गाला तुटपुंजी फक्त ८ टक्के वाढ देण्याचा अंतिम प्रस्ताव दिला असल्याचे समजते. वाढीव पगारवाढीचे फरक पूर्ण मिळून वाढीव पगारवाढीचा लाभ अधिकारी वर्ग गेली ३४ महिने घेत असून कामगार वर्गाला जाचक अटी टाकून तुटपूंजी वाढ दिल्याने व्यवस्थापनाकडून कामगार वर्गाला दिल्या जाणाऱ्या अपमानकारक वागणुकीबद्दल तीव्र असंतोष, नाराजी पसरल्याचे चित्र सध्या आहे.

 तर बेमुदत संपाशिवाय दुसरा पर्याय  नाही - कर्मचारी
चर्चेच्या अनेक फेऱ्या होऊन ही कामगाराना सन्मानजनक प्रस्ताव मिळत नसल्याने को-ऑर्डिनेशन कमिटीने बेमुदत संपावर जाण्याचे निश्चित केले आहे. लखनऊ येथे झालेल्या कमिटीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. व्यवस्थापनाकडून वेळकाढू आणि आडमुठे धोरण घेतल जात आहे. आंदोलनाचे सर्व पर्याय वापरल्यानंतर ही जर व्यवस्थापन सकारात्मक भूमिका घेत नसेल तर बेमुदत संपाशिवाय दुसरा पर्याय नाही, आणि या बेमुदत संपास केवळ व्यवस्थापनाची कामगार वर्गाला दिली जाणारी सापत्न वागणूक कारणीभूत असल्याचे मत  मांडण्यात आले आहे.अधिकारी वर्गाच्या तुलनेत अतिशय तुटपूंजी वाढ व्यवस्थापन देऊ करत असल्याचे मत को-ऑर्डिनेशन कमिटीच्या वतीने मांडण्यात आले. आस्थापनेप्रती कामगार प्रामाणिक असून जर कंपनी आर्थिक संकटात असेल तर अधिकारी वर्गाला दिलेली १ जानेवारी २०१७ पासून दिलेली वेतनवाढ बंद करावी आणि आर्थिक स्थिति उत्तम झाल्यावर अधिकारी आणि कामगार वर्गाची सोबत वेतनवाढ करावी अशी भूमिका कमिटीच्या वतीने मांडण्यात आली आहे. परंतु कंपनीची आर्थिक स्थिति उत्तम असून केवळ कामगार वर्गाच्या रास्त मागणीवर व्यवस्थापन गदा आणत आहे.
    
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: HAL employee on strike