आणी 'या' ही ठिकाणी बिबट्याने केला हल्ला..

bibtya.jpg
bibtya.jpg

नाशिक : बेसुमार वृक्षतोड, भक्ष्य व पाण्याचा अभाव यामुळे वन्यप्राणी मानवी वस्त्यांकडे धाव घेऊ लागले आहेत. त्र्यंबकरोड परिसरातील वासाळी गावामधील शेतकरी एकनाथ भावले यांची गाय शेतात चरत असतांना (ता.१४) सोमवारी सायंकाळी साडे पाचच्या सुमारास बिबट्याने झडप घालुन तिची शिकार केली आहे. त्यावेळेस नवनाथ भावले हे देखील त्यांचे जनावर चारत होते अशा वेळी ग्रामस्थांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित झाला असून वासाळीगाव ते  त्र्यंबकरोड २ किलोमिटरचे अंतर जीव मुठीत धरुन आबालवृध्दांना पायी जावे लागते. यावेळी अनेकांना बिबट्याने दर्शन दिले आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वनविभागाकडून शेतक-यास मदत द्यावी व बंदोबस्त करावा अशी मागणी वासाळीगावचे युवक रोशन चव्हाण यांनी केली आहे. घटनेची दखल घेऊन वनविभाग अधिकारी देशपांडे, सचिन आहेर यांनी पंचनामा केला. पंचनामा करते वेळी बाळासाहेब चव्हाण, नवनाथ भावले, एकनाथ भावले, अजय भावले हे देखिल उपस्थित होते.

प्रतिक्रिया  
वासाळी गाव या भागात वन्यप्राण्यांची संख्या मोठी आहे. मात्र, लपायला जागा नसल्यामुळे तसेच भक्ष्य मिळविण्यासाठी बिबट्या तेथील शेतकरी वर्गाचे मोठ्या प्रमानात नुसकान करत असल्याचे अनेक वेऴा दिसले आहे तसेच प्राण्यांवर हल्ले करू लागला आहे. त्र्यंबकरोड परिसरात बिबट्याची दहशत पसरली आहे. आतापर्यंत अनेक पाळीव प्राण्यांचे बळी घेण्याबरोबरच अनेकांना जखमीही केले आहे. यावर वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे. :- रोशन चव्हाण ,वासाळी 

बिबट्या मानवी वस्त्यांत शिरण्याला जबाबदार कोण?
बेसुमार जंगलतोड व अवैध शिकारीमुळे एकीकडे वाघ, सिंहासारखे मार्जार कुळातील हिंस्त्र श्वापदे झपाट्याने कमी होत असताना याच कुळातील बिबट्याने मात्र आजही आपले अस्तित्व टिकवून ठेवले आहे. मुळातच अतिशय चाणाक्ष, बुध्दिमानी व संधिसाधू स्वभावाचा बिबट्या, असेल त्या परिस्थितीशी, वातावरणाशी जुळवून घेण्यात तरबेज मानाला जातो. त्यामुळेच तो अगदी हिमालयातील बर्फाळ प्रदेशापासून ते थेट समुद्र किनारपट्टीपर्यंत हमखास आढळून येतो. सहसा दाट झाडी-झुडपात लपून -छपून जीवन जगणारा बिबट्या अत्यंत 'तरबेज शिकारी’ समजला जातो. मिळेल त्या परिस्थितीत मिळेत ती शिकार करण्याचं कसब अंगी भिनलेले बिबटे जंगले नष्ट झाल्याने मोठ्या प्रमाणत विस्‍थापित होत आहेत. पोटाची भूक शमविण्यासाठी पारंपरिक शिकार मिळत नसल्याने ते साहजिकच मानवी वस्त्यांकडे आकर्षिले जात आहेत. मानवी वस्त्यांच्या शिवेवर येऊन मिळेल त्या भक्षाची शिकार करताना त्यांचा जगण्यासाठीचा संघर्ष आता आणखी कठीण होत चालल्याची लक्षणे स्पष्ट दिसू लागली आहेत.  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com