Vidhan Sabha 2019 : महायुतीत आमची अवस्था ईकडे आड तिकडे विहीर : महादेव जानकर

सकाळ वृत्तसेवा 
बुधवार, 16 ऑक्टोबर 2019

महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी व्यक्त करताना महायुतीत आमची अवस्था ईकडे आड तिकडे विहीर अशी झाल्याचे सांगताना जानकरांनी वेळेवर स्वत:ला सावरून घेतल्याचा प्रकार आज (ता.१६) नाशिक मध्ये घडला. 

नाशिक : महायुतीच्या जागा वाटपात नाराज असलो तरी मी भाजप सोबत आहे, त्याला कारण म्हणजे कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसने कोणालाही मोठं होऊ न देता सगळं स्वतःच्या ताब्यात ठेवलं. भाजप सरकारच्या काळात सर्वचं सकारात्मक झाले असे मी म्हणतं नाही, निदान प्रयत्न तरी झाले यावर माझा विश्‍वास असल्याचे मत महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी व्यक्त करताना महायुतीत आमची अवस्था ईकडे आड तिकडे विहीर अशी झाल्याचे सांगताना जानकरांनी वेळेवर स्वत:ला सावरून घेतल्याचा प्रकार आज नाशिक मध्ये घडला. 

रासप आणी भाजपाची भांडणं ही घरातली

महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी जानकर नाशिकमध्ये आले होते. भाजपच्या वसंतस्मृती कार्यालयात त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर माझा विश्‍वास आहे. "रासप' ला मुख्यमत्र्यांकडून कोणतही आश्‍वासन मिळाले नाही फक्त फक्त विकास या मुद्द्यावर महायुतीत सामिल झालो आहोत. महायुतीतं बंडखोरी झाल्याची कबुली देताना सर्वचं पक्षांकडून बंडखोरांवर कारवाई करण्याची युतीच्या नेत्यांची भुमिका आहे. रासप व भाजप मध्ये भांडण असले तरी प्रत्येकाला आपला पक्ष मोठा व्हावा असे वाटते. परंतू आमची भांडणे हि घरातली आहेत व ती मिटली देखील. महात्मा फुले यांना भारतरत्न सन्मान मिळावा, या मागणीवर ठाम रासप ठाम असून केंद्र सरकारला तशी शिफारस करण्यात आली आहे. महायुती मध्ये सर्वात ताकदवान भाजप असल्याने त्या अर्थाने सगळ्यांचा मोठा भाऊ असल्याचे जानकर यांनी स्पष्ट केले. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष गिरीष पालवे, नाना शिलेदार, पवन भगुरकर आदी उपस्थित होते. 
 
कमरेखालची भाषा योग्य नाही 
निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह विरोधकांकडून कमरे खालची भाषा बोलली जात आहे. लोकशाही आहे म्हणून काहीही बोलावे अपेक्षित नाही. पवार देशाचे नेते आहेत. त्यांनी जबाबदारीने भाषा वापरली पाहिजे. विरोधकांनी विकासावर बोलले पाहिजे. काही शंका असल्यास जरूर जाब विचारावा, त्याचे उत्तर आम्ही देवू. परंतू कमरेखालची भाषा योग्य नाही. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mahadev jankar press conference in nashik