मिग-29 च्या ताकदीत वाढ, 2021 अखेर 100 टक्के "मिग' चे आधुनिकीकरण 

residentional photo
residentional photo



नाशिक : भारतीय वायुसेनेतील लढावू विमान "मिग-29' मध्ये होत असलेल्या आधुनिकीकरणामुळे यांच्या ताकदीत मोठी वाढ झाली आहे. आतापर्यंत देशातील 50 टक्के "मिग-29' चे आधुनिकरण करण्यात आले आहे. 2021 अखेरपर्यंत 100 टक्के हे काम पूर्ण होणार असल्याचे ओझर येथील 11 बेस रिपेअर डेपोचे एअर ऑफिसर कमांडिंग समीर बोराडे यांनी सांगितले. 

  8 ऑक्‍टोबर रोजी वायूसेनेच्या 86 व्या वर्धापन देशात साजरा केला जाणार आहे. याच पार्श्‍वभूमीवर ओझर येथे आयोजित कार्यक्रमानिमित्त एअर कमांडिंग ऑफिसर समीर बोराडे यांनी 11 बेस रिपेअर डेपो आणि येथे होत असलेल्या विमानांचे आधुनिकीकरण, देखभाल आणि दुरूस्ती संदर्भात माहिती दिली. 
श्री बोराडे यांनी सांगितले, की आज 11 बेस रिपेअर डेपो देशातील वायुसेनेच्या लढावू विमानांचे आधुनिकीकरण देखभाल दुरूस्तीचे कामे करत आहे.

वायुदलात समाविष्ठ असलेल्या मिग-29 आणि सुखोई-30 देखभाल आणि दुरूस्ती देखील येथे केली जात आहे. 9 वर्षात 800 तास हवेत चालल्यानंतर मिग- 29 च्या आधुनिकीकरण करण्यात येत आहे. यात सर्व आधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश आता करण्यात येत आहे. त्यामुळे याचे आयुष्य 35 ते 40 वर्षापर्यंत पोहचले आहे. आधुनिकीकरणामुळे हवाई क्षमतेबरोबरच हवेतल्या हवेत आणि जमिनीवर मारा करता येणार आहे. यासह हवेतल्या हवेत इंधन भरण्याची सुविधा देखील यात करण्यात येत आहे. तसेच रडार व्यवस्था देखील अधिक मजबूत केली जात असल्याने वैमानिकांना आपले लक्ष्य आता साध्य करणे आधिक सोपे होणार आहे. 

 ट्‌वीन इंजिन, मिसाईल, गाईडिंग बॉम्ब, गन अशी शस्त्रास्त्रे देखील यात समाविष्ठ करण्यात आली आहे. वैमानिकांच्या सुरक्षिततेचा देखील विचार यात करण्यात आला असून इंजेक्‍शन सीट आधिक काम करण्यात येत आहे. कॉकपीटची जागा वाढविली गेली असून पंख्यांची लांबीही वाढविण्यात आली आहे. 
यामुळे 45 मिनिटे हवेत थांबविण्याच्या क्षमतेत दुप्पटीने वाढ झाली असून अपघातांमध्येही खूप मोठी घट झाली असल्याचेही बोराडे यांनी सांगितले.

सुखोई 30 च्या देखभाल दुरूस्तीचे काम 11 बेस रिपेअर डेपो मार्फेत केले जात असून याचे 24 एप्रिल 2018 रोजी प्रथम यशस्वीरित्या उड्डान देखील येथूनच झाल्याचे बोराडे यांनी सांगितले. सुखोई-30च्या इंजेक्‍शन सीटवर येथे करण्यात आलेल्या संशोधनाचे कौतुकही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. यावेळी डेपोतील सर्व वरिष्ठ अधिकारी, जनसंपर्क अधिकारी बसंतकुमार पांडे उपस्थित होते. 


आधुनिकीकरणात डेपो परिपूर्ण 
मिग-29 च्या आधुनिकीकरणासाठी आवश्‍यक असलेला सर्व प्रकारचे तज्ज्ञ आपल्याकडे आहेत. आधुनिकीकरणासाठी लागणारे सर्व प्रकारचे सुट्टे भाग हे आपल्याकडेच तयार होत असल्याने आपण परिपूर्ण झालो असून यामुळे दुसऱ्यांवर आता अवलंबून रहावे लागत नसल्याचेही यावेळी बोराडे यांनी सांगितले. तसेच आधुनिकीकरणासाठी सुखोई 30 लागत असलेला 22 महिन्यांचा कालावधी 17 ते 18 महिने आणण्यावर आमचा भर असल्याचेही यावेळी तज्ज्ञांनी सांगितले. 

11 बेस रिपेअर डेपो मार्फेत झालेले आधुनिकीकरण 
एस यू 7 100 1975- 1983 
मिग -21 28 1983- 1988 
मिग -23 248 1988 - 2015 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com