एकमेकांना धक्के देण्यापेक्षा पक्ष वाढवा,सत्तेवर आणा- थोरात

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 जुलै 2019

नाशिक- आगामी विधानसभा निवडणुकीत कोणी एकमेकांना धक्के देण्याचा प्रयत्न केल्यास त्याची दखल घेत निवडणुकीनंतर होणाऱ्या पुर्नरचनेत त्यांना धक्के बसल्याशिवाय राहणार नाही असा खरमरीत ईशारा कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांना देताना राज्यात कॉंग्रेसला पुन्हा सत्तेवर आणण्यासाठी प्रत्येकाने योगदान देण्याचे आवाहन केले. 

नाशिक- आगामी विधानसभा निवडणुकीत कोणी एकमेकांना धक्के देण्याचा प्रयत्न केल्यास त्याची दखल घेत निवडणुकीनंतर होणाऱ्या पुर्नरचनेत त्यांना धक्के बसल्याशिवाय राहणार नाही असा खरमरीत ईशारा कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांना देताना राज्यात कॉंग्रेसला पुन्हा सत्तेवर आणण्यासाठी प्रत्येकाने योगदान देण्याचे आवाहन केले. 

   कॉंग्रेसच्या उत्तर महाराष्ट्र विभागिय मेळावा तुपसाखरे लॉन्स मध्ये झाला. या बैठकीत ते बोलत होते. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निवडणुका होण्याची दाट शक्‍यता आहे. या निवडणुकीत प्रत्येकाच्या कामकाजावर नजर राहणार असून त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित राहणार आहे. निवडणुकीनंतर माझ्या कामाचा दुसरा टप्पा सुरु होईल. यात ज्यांनी विधानसभा निवडणुकीत एकमेकांना धक्के दिले त्यांना धक्के देण्याचे काम होईल. जे पक्ष अहिताचे काम करतील त्यांना भविष्यकाळ चांगला राहणार नसल्याचे थोरात यांनी स्पष्ट केले. 
   

कॉंग्रेसला सध्या चांगले दिवस नाही हे सत्य असले तरी इंदिरा गांधी यांना देखील अपयशाला सामोरे जावे लागले होते. सन 1999 मध्ये कॉंग्रेसचे विभाजन झाल्यानंतर देखील अशी परिस्थिती निर्माण झाली होती त्यावेळी कॉंग्रेस संपल्याचा प्रचार करण्यात आला मात्र कॉंग्रेसने पुन्हा उभारी घेतली. आताही कॉंग्रेसला नव्याने पालवी फुटेल व नव्या डौलाने पक्ष उभा राहिल असा आशावाद थोरात यांनी व्यक्त केला. पक्षातून अनेक लोक गेले मात्र त्याने काही फरक पडतं नाही त्या जागा नवीन लोक भरून काढतात. लाट येते अन जाते त्यामुळे शाश्‍वत हेचं टिकते. कॉंग्रेसचा अजेंडा शाश्‍वत आहे असे ते म्हणाले,
    . राज्य घटना व धर्मनिरपेक्षतेला धरून आहे. कारगिल दिनाची आठवण देताना थोरात यांनी बोफोर्स तोफांचा मुद्दा उपस्थित केला. ज्या बोफोर्स तोफांवर टिका झाली. कारगिल दिनाला त्याच तोफा कामी आल्या. पिकविम्याचे पैसै मिळत नसल्याने सत्तेतील वाटेकरी शिवसेनेने मोर्चा काढला. यातून शिवसेनेने शेतकयांच्या बाबतीत ठिक चालले नसल्याचे स्पष्ट केले. भाजप हा पक्ष भाजप हा पक्ष आहे की बकासुर हे कळतं नाही. अनेकांना घेवूनही त्यांची भूक भागात कशी नाही? असा सवाल करताना पैशाच्या जोरावर फोडाफोडी करून आमदार विकतं घेतले जात असल्याचा आरोप थोरात यांनी केला.

कॉंग्रेसचे सचिव डब्ल्यु.सी. रेड्डी यांनी महाराष्ट्रात सत्ता आणण्याचे आवाहन केले. प्रदेश कार्याध्यक्ष माजी आमदार मुजफ्फर हुसेन म्हणाले, सोशल मिडीयावर मांडला जात असलेला देश तरुणांना खरा वाटतं आहे. देश दहा, बारा वर्षात उभा राहीला नाही. जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांनी कार्यकर्ता मोठा करणाऱ्या कॉंग्रेसला पुन्हा वैभव प्राप्त करून देण्याचे आवाहन केले. प्रास्ताविक शहराध्यक्ष शरद आहेर यांनी केले. व्यासपिठावर जेष्ठे नेते विनायक दादा पाटील, आमदार निर्मला गावित, जिल्हा परिषद उपाध्यक्ष नयना गावित, माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, माजी जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, डॉ. हेमलता पाटील, अश्‍विनी बोरस्ते, शाहु खैरे, राहुल दिवे, समिर कांबळे, दिगंबर गिते, शैलेश कुटे आदी उपस्थित होते. 
------------ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news balasahab thorat