महाजनादेश यात्रेनंतर आता महायुतीची विजयरथ यात्रा,मुख्यमंत्र्यांची घोषणा 

live
live

नाशिक: भारतीय जनता पक्षाच्या महाजनादेश यात्रेच्या बाईक रॅलीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये सिडकोतून उत्साहात प्रारंभ झाला. तब्बल दोन तास उशिराने महाजनादेश यात्रेला प्रारंभ झाला असला तरीही पाथर्डी फाटा ते दत्तमंदिर चौकपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा थांबून असलेल्या नागरिकांनी मुख्यमंत्र्यांचे गुलाबपुष्पांच्या वर्षावात स्वागत केले. चौका-चौकात भाजपा नेत्यांकडून यात्रेचे स्वागत ढोलताशाच्या गजरात करण्यात आले. 
   महाजनादेश यात्रेला आज सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास पाथर्डी फाटा येथून प्रारंभ झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी स्वागत केले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केल्यानंतर महाजनादेश यात्रेला प्रारंभ झाला. यावेळी पर्यटन विकास मंत्री जयकुमार रावल, महाराष्ट्राचे प्रभारी भूपेंद्र यादव, आमदार सीमा हिरे, देवयानी फरांदे, शहराध्यक्ष गिरीश पालवे हे महाजनादेश यात्रेच्या रथावर होते. पाथर्डी फाटा येथून निघालेली अंबड-लिंक रोडने उत्तमनगर चौकाकडे मार्गस्थ झाली. या दरम्यान रस्त्याच्या दुतर्फा थांबलेल्या नागरिकांकडून महाजनादेश यात्रेचे स्वागत केले जात होते. चौकांमध्ये रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. उत्तमनगर चौकात आमदार सीमा हिरे यांच्याकडून स्वागत करण्यात येऊन गुलाबपुष्पांचा वर्षाव करण्यात आला. तसेच, ढोलताशांच्या गजरात पारंपरिक वेशभूषेतील महिलांनी स्वागत केले. रॅलीच्या प्रारंभी शेकडो बाईकस्वार तरुण होते तर मुख्यमंत्र्यांच्या रथासमोर मोटारसायकलवर महिला सहभागी झाल्या होत्या
    महाजनादेश यात्रा पंचवटीत पोहचल्यानंतर तेथेही कार्यकर्ते,पदाधिकाऱ्यांनी जोरदार स्वागत केले. 32 जिल्हे,4232 किलोमीटर,188 मतदारसंघ,228 स्वागत सभा घेत हा प्रवास करून नाशिकमध्ये या यात्रेचा समारोप झाला. या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला मानाचा मुजरा केला. मी समारोप भाषण उद्या करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. राज्यात या यात्रेला लोकांनी प्रचंड पाठिंबा दिला, महाजनादेश यात्रा आता संपली आता तयारी विजय यात्रा काढण्यात येणार असून विधानसभेवर पुन्हा भगवा फडकणार असल्याने जनतेचा आशिर्वाद हाच महाजनादेश
- महायुतीचा झेंडा फडकावून परत येणार असे ते म्हणाले.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com