कलम ३७० च्या संपर्क,जनजागरण अभियान संयोजकपदी राजेश पांडे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 सप्टेंबर 2019

नाशिक-पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय गृहमंत्री अमित यांनी जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० रद्द केल्याबद्दल संपर्क अभियान व जनजागरण अभियान सर्वत्र राबविण्यात येणार आहे. या दोन्ही अभियानाच्या संयोजनासाठी भारतीय जनता पक्षाचे नवनिर्वाचित प्रदेश सचिव राजेश पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली समिती नेमण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नुकतेच भाजपा प्रदेश उपाध्यक्षांची घोषणा केली. त्याचवेळी ही समिती निश्चित केली आहे. श्री.पांडे यांच्याकडे प्रदेश सचिवपदांबरोबरच पश्चिम महाराष्ट्र संघटक ही जबाबदारी आहे.

नाशिक-पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय गृहमंत्री अमित यांनी जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० रद्द केल्याबद्दल संपर्क अभियान व जनजागरण अभियान सर्वत्र राबविण्यात येणार आहे. या दोन्ही अभियानाच्या संयोजनासाठी भारतीय जनता पक्षाचे नवनिर्वाचित प्रदेश सचिव राजेश पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली समिती नेमण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नुकतेच भाजपा प्रदेश उपाध्यक्षांची घोषणा केली. त्याचवेळी ही समिती निश्चित केली आहे. श्री.पांडे यांच्याकडे प्रदेश सचिवपदांबरोबरच पश्चिम महाराष्ट्र संघटक ही जबाबदारी आहे. याशिवाय आता नव्याने या अभियानाची धुरा त्यांच्या खांद्यावर देण्यात आली आहे. समितीतील अन्य सदस्य असे- संपर्क व जनजागरण अभियान - राजीव पांडे,सुनिल राणे (मुंबई),सुभाष काळे,दीपक जाधव(कोकण),भरत पाटील,नामदेव ताकवणे(पश्चिम महाराष्ट्र),अरविंद जाधव,सुनिल बच्छाव(उत्तर महाराष्ट्र),बसवराज मंगरूळे,राम कुलकर्णी(मराठवाडा),देवेंद्र कस्तुरे,शिवराय कुलकर्णी(विदर्भ)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news rajesh pande selection