चांगले कार्य करून जीवनाला उत्सव बनवा-श्री श्री रविशंकर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 ऑक्टोबर 2019

नाशिक: यज्ञातून तरंग अनुभवता येतो. ज्ञानाची ज्योत आपल्यात सामावून घेतली पाहिजे. पंचेंद्रिये माध्यमातून ज्योत कायम तेवत ठेवा. जीवनात कायम प्रसन्न राहा. चांगले काम करून जीवनाला उत्सव बनवा, असा संदेश दीपावली निमित्त आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रमुख  पद्मविभूषण श्री श्री रविशंकरजी यांनी दिला.

नाशिक: यज्ञातून तरंग अनुभवता येतो. ज्ञानाची ज्योत आपल्यात सामावून घेतली पाहिजे. पंचेंद्रिये माध्यमातून ज्योत कायम तेवत ठेवा. जीवनात कायम प्रसन्न राहा. चांगले काम करून जीवनाला उत्सव बनवा, असा संदेश दीपावली निमित्त आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रमुख  पद्मविभूषण श्री श्री रविशंकरजी यांनी दिला.

   साधुग्राम तपोवन येथे आर्ट ऑफ लिव्हिंग नाशिकतर्फे आयोजित "भाऊबीज दीपावली मिलन" कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कृषिमंत्री डॉ. अनिल बोण्डे, खासदार भारती पवार, आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, माजी आमदार बाळासाहेब सानप, माजी महापौर अशोक मुर्तडक यांच्यासह आर्ट ऑफ लिव्हिंगचे समन्वयक विजय हाके, स्वामी वैशंपायन, स्वामी प्रणवानंद, चिराग पाटील, राहुल पाटील उपस्थित होते.
श्री श्री रविशंकर यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की समस्या सर्वानाच येतात. भगवान राम आणि कृष्ण यांच्या जीवनातही समस्या होत्या. आपली समस्या आपल्यापेक्षा छोटी आहे, हे समजून घेतले तर दुःख दूर होईल. जे करायचे ते प्रसन्न राहून करा. जे होऊ शकत नाही ते सोडून देऊन जीवनाचा आनंद घ्या. सत्याचा नेहमी विजय होत असतो. अयोध्येचा प्रश्न लवकरच सुटून आपले स्वप्न साकार होईल

आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून विषमुक्त अन्न कसे तयार करावे, हवामानाशी मैत्री करून कसे उत्पादन घ्यावे याचे प्रशिक्षण शेतकऱ्यांना दिले जात आहे. ग्रामीण जीवनात परिवर्तन करण्याचे काम या मार्गाच्या माध्यमातून होत आहे. अमरावती जिल्ह्यात नाला खोलीकरण, बंधारे, शौचालय, व्यसनमुक्ती असे मोठे काम केले आहे. या मार्गातून शेतकऱ्यांच्या जीवनात सुख शांती येत आहे.

- डॉ. अनिल बोंडे कृषीमंत्री

क्षणचित्रे
-सुमारे 1 लाख भाविकांची उपस्थिती

- श्री श्री रविशंकरजी यांनी 300 मीटर रॅम्पवर चालत जाऊन भाविकांवर पुष्पवृष्टी करून आशीर्वाद दिले. 

- सुमारे 20 हजार दिव्यांनी त्यांची आरती करण्यात आली
- यावेळी झालेल्या भजनामध्ये भाविकांनी तल्लीन होऊन ठेका धरला. 

- आज वरूण राजाने कृपा केल्याने संयोजकानी सुटकेचा निःस्वास सोडला


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news ravishankar