साहित्य महामंडळ निवड समितीकडून जागांची पाहणी,१० ऑगस्टपर्यत स्थळ होणार निश्चित

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 जुलै 2019

नाशिकः पुढील वर्षी(2020) होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी साहित्य महामंडळाच्या स्थळ निवड समितीने आज नाशिकमधील विविध जागांची पाहणी केली. उद्या (ता. 16) ही समिती उस्मानाबादला पाहणी करण्यासाठी जाणार आहे. उस्मानाबादची पाहणी झाल्यानंतर समिती आपला अहवाल साहित्य महामंडळाला सादर करेल. त्यावर विचार करून साहित्य संमेलनाच्या स्थळाविषयी निर्णय घेतला जाईल. 10 ऑगस्टपर्यंत संमेलनस्थळ निश्‍चित होणार असल्याची माहिती अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी दिली. 
 
औरंगाबादकर सभागृहात त्यांनी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी साहित्य महामंडळाच्या स्थळ निवड समितीतील डॉ. दादा गोरे, प्रकाश पायगुडे, प्रदीप दाते, प्राचार्या प्रतिभा सराफ, रामचंद्र साळुंखे, के. एस. अतकरे यांच्यासह सावानाचे उपाध्यक्ष किशोर पाठक, नानासाहेब बोरस्ते, प्रा. डॉ. शंकर बोऱ्हाडे, अभिजित बगदे, शंकर बर्वे, देवदत्त जोशी, भानुदास शौचे, संगीता बाफना, वसंत खैरनार, गिरीश नातू, ऍड. नितीन ठाकरे, मधुकर झेंडे उपस्थित होते. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news sahitya mahamandal