कॉग्रेस-राष्ट्रवादी प्रत्येकी १२५ जागा लढणार,मित्रपक्षांना ३८ जागा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 सप्टेंबर 2019

नाशिक : काँग्रेस- राष्ट्रवादी प्रत्येकी 125 जागा लढणार उर्वरित 38 जागा मित्रपक्षांना देणार असे, राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे अध्यक्ष,जेष्ठ नेते शरद पवार यांनी सांगितले. श्री.पवार नाशिक जिल्ह्यातील तालुक्यांचा आढावा घेण्यासाठी आज नाशिकमध्ये आले. कार्यकर्ते,पदाधिकाऱ्यातर्फे त्याचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर त्यांनी तालुकानिहाय आढावा घेतला आणि पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडली. ते म्हणाले,  काँग्रेस, राष्ट्रवादी शेकाप, जोगेंद्र कवाडे, स्वाभिमानी राजू शेट्टी इतर डावे पक्ष एकत्रित निवडणूक लढवणार आहे. या आघाडीत मनसेला स्थान नसेल.

आम्ही सारे जण एकत्रित प्रचार राबविण्याचे नियोजन करत आहोत.

ते म्हणाले, यंदाच्या निवडणूकीत नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात येणार आहे
 या आठवड्यात निवडणूक आयोग कार्यक्रम जाहीर करेल,बहुधा पंतप्रधानांचा नाशिक  दौऱ्यावर झाल्यानंतर निवडणूक जाहीर होईल,असे वाटते. दिवाळीच्या अगोदर आठवडाभर मतदान होईल असाही अंदाज व्यक्त होत आहे. एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाण्याच्या मेगाभरतीचा प्रकार 1957 आणी 62 ला झाला होता  मात्र,सध्याचा वेग आणी प्रमाण हे अधिक असल्याचे लक्षात येत आहे. 

 ते म्हणाले, अमंलबजावणी संचालनालय नोटीस दाखवून माझ्या काही सहकार्यांना धमकी दिली. मी नावं संगणार नाही, आमच्यातून गेलेल्या लोकांनी हे सांगितलं,  आमच्यातून गेलेल्या लोकांनी हे सांगितलं.-मेगाभरतीचं लोकांना काही समाधान नाही. राष्ट्रवादीत येणाऱ्यांबाबत समिती निर्णय घेईल असेही ते म्हणाले,

पाकिस्तानबद्दल काही बोललो नाही

- मेगाभरतीचं लोकांना काही समाधान नाही असे सांगुन ते म्हणाले, राष्ट्रवादीत येणाऱ्यांबाबत समिती निर्णय घेणार,उदयनराजे यांच्या आरोपांवर काही बोलणार नाही,15 वर्षानंतर त्यांना हे आरोप सुचले का ?
 असे सांगुन ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी माहिती घेऊन बोललं पाहिजे* 
- मी पाकिस्तान बद्दल काहीही बोललो नाही,  मित्रांशी बोलताना मी माझा अनुभव सांगितला, क्रिकेट टिम गेली होती तेव्हाचा तो अनुभव होता.
 आपल्या क्रिकेट पटूंनी काढलेल्या रनला ते स्वागत करत होते,असे मी बोललो होतो.
राज ठाकरे माझी चर्चा,पण बहिष्कार अशक्य
- ते म्हणाले, माझी आणी राज ठाकरे यांची चर्चा झाली आहे, या निवडणुकीवर बहिष्कार टाका ही त्यांची भूमिका आहे पण त्यांची भूमिका आम्हाला मान्य नाही. प्रत्येक राजकारणी,उमेदवार हा निवडून येईल असा आशावादी असतो.- लोकं राज्य सरकारवर नाराज आहे
- सरकारविरोधात आहे. हे आपल्याला विसरता येणार नाही. असे ते म्हणाले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news sharad pawar