शिक्षणासाठी झगडपाडाच्या शिवनदीपात्रातून विद्यार्थ्यांचा रोजच संघर्ष

live
live

पळसन बातमीदार -एकीकडे आपण डिजिटल इंडियाचे स्वप्न पाहत असतांना सुरगाणा तालुक्यातील आबेपाडा जवळील झगडपाडा (बे) हे गाव माञ अनेक सोयी सुविधा पासुन वंचित आहे. येथील विद्यार्थी रोजच जीव धोक्यात घालुन भरपुरात शिव नदी ओलांडून ज्ञानाजर्नासाठी जात आहे. त्यांचा हा संघर्ष रोजचाच आहे.

   . स्कूल चले हम.जिवावर उदार होण्याच्या या प्रकरणातून या चिमुरड्याची सुटका व्हावी; पण अधिका-यांपर्यत या चिमुरड्याचा आवाज पोचत नाही. हे दुर्भाग्य आहे. शासकीय आश्रम शाळा व जिल्हा परिषदेच्या शाळेत येण्यासाठी शिव नदीच्या पाञात पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने पोहवत आबेपाडा व बा-हेला जातात. अनेक वर्षापासून  येथील ग्रामस्थांचा व विद्यार्थ्याचा हा जीवघेणा संघर्ष सुरू आहे. या गावांना जोडणारे मुख्य गाव आबेपाडा,बा-हे असुन येथुनच तालुक्याच्या व जिल्ह्याच्या गावी संपर्क साधला लागतो.

गेल्या आता संद्याची परिस्थितीला शिवनदी नदी ही दुथडी भरून  वाहत होती . या वेळी येथील सर्व व्यवहार ठप्प होते. एखादा आजारी पडलाच तर त्याला उपचारासाठी दवाखान्यात नेता येत नाही. एखादा खूपच आजारी पडल्यावर पट्टीच्या पोहवणा-या माणसाला शोधुन शिव नदी पार करून द्या , अंशी हात जोडून विनवणी करावी लागते. कमरेएवढ्या पुराच्या पाण्यात उतरण्याशिवाय पर्याय नसतो. रूग्णांना डोली करून आणणेही कठीण होऊन बसते.  या गावाची लोकसंख्या पाचशेहुन अधिक आहे. झगपाडाला जोडण्यासाठी कोणत्याही प्रकारचा पुल नाही. येथील मुले. मुली व महिला पट्टीच्या पोहवणा-या आहेत. असे असले तरी विद्यार्थ्यांचा हा स्वताःच्याच जीवांशी चालणारा संघर्ष केव्हा संपणार या कडे तालुक्यातील सर्वांचेच लक्ष लागले आहे.

    पहिली ते बारावीपयॅतची मुले आबेपाडा  येथे येणारे महाविद्यालयीन युवक - युवती यांना रोजच हा संघर्ष करावा लागतो. या शिवनदीपाञात यापूर्वी शासनाने फरशी बाधली होती,. तीही शेवाळावरून पाय सरकु नये  पण ते काम निकृष्ठ दर्जाचे झाल्याने त्याच वर्षी पहिल्याच फरशीला तडे गेले, मुलांना प्रसंगी पुराच्या पाण्यातुन पोहवत किणा-या वर यावे लागते. शालेय गणवेश तर नदीच्या किना-यावर ठेवावे लागते. 

 मी इयत्ता पहिली पासुन आता दहावीत शिक्षण घेत आहे. रोज ये -  जा करते पावसाळ्यात चार महिने माझ्या शिक्षणात शिव नदी पाञातुन जात असताना मोठी अडचण होते..वेळेवर शाळेत जाता येत नाही.

चिञा जाधव,रूपाली जाधव विद्यार्थीनी.

गेल्या अनेक वर्षांपासून माझे आजोबा. पंजोबा. वडिल. व मी स्वताः आता माझ्या मुली या शिव नदी पाञात संघर्ष करतात या पुढेही असाच संघर्ष चालु राहणार  काय? माझ्या गावातले मुले  शाळेत जातांना पावसाळ्यात चार महिने शेतीचे कामे सोडुन सकाळ संध्याकाळ शिव नदीपाञातुन खांद्यावर बसवून शाळेत सोडावे लागते

अशोक जाधव. पालक.  

)भारत देशाला स्वातंत्र्य होऊन अनेक वर्षे होऊन गेली पाञ झगडपाडा  गावाला शिव नदी पात्रात आंम्ही आजही झुंज देत आहोत अजुनही झगपाडा गावाला स्वातंत्र्य मिळाले नाही एखादा आजारी माणसे डोली बांधून दुस-या गावी दवाखान्यात घ्यावे लागते.

मनोहर  जाधव.सामाजिक कार्यकर्ते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com