नऊ वर्षानंतर ९ ऑगस्ट रोजी ठरला शिक्षकभरतीचा मुहूर्त 

live
live

तळवाडे दिगर- राज्यात नऊ वर्षापासून रखडलेल्या शिक्षक भरतीला आखरे नऊ वर्षानंतर ९ ऑगस्टचा मुहूर्त ठरला. पवित्र पोर्टलवरूनच राज्यात १२ हजार शिक्षकांची भरती प्रक्रिया पार पडणार आहे. लाखभर उमेदवारांच्या नजर आता ९ ऑगस्टला लागणाऱ्या शिक्षक भरतीच्या अंतिम यादीकडे लागल्या आहेत.

    पवित्र पोर्टलच्या संकेंतस्थळावर आज (शुक्रवारी) आलेल्या सूचनेनुसार ९ ऑगस्ट २०१९ सायंकाळी पाचनंतर मुलाखतीशिवायचा प्राधान्यक्रम दिलेल्या उमेदवारांना त्यांनी निवडलेल्या प्राधान्य क्रमानुसार संस्थांसाठीच्या उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येणार असून, तसेच १६ ऑगस्ट २०१९ रोजी सायंकाळी पाचनंतर मुलाखतीसह प्राधान्यक्रम दिलेल्या उमेदवारांना त्यांनी निवडलेल्या प्राधान्य क्रमानुसार संस्थांसाठीच्या उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची सूचना प्रवित्र पोर्टलच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.

      दोन वर्षाचा डी.एड. बी एड  अभ्यासक्र पूर्ण केल्यानंतर शासनाने नवीन सोंग घेऊन प्रथम टीईटी त्यानंतर अभियोगता चाचणी असे टप्पे ठेवूनही तरुणांनी परीश्रम घेत दोन्ही परीक्षेत आपली गुणवत्ता सिद्ध करून नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या राज्यातील ८४ हजार गुणवत्ता धारक उमेदवारांच्या अशा या सूचनेने पल्लवित झाल्या आहेत.

    शिक्षक भरती पवित्र पोर्टलद्वारे घेण्याची घोषणा होऊनही जवळपास दोन वर्ष उलटून देखील कधी प्रशासकीय तर कधीतात्रिक बाबींमध्ये अडकलेली प्रक्रिया कधी पूर्ण होते याकडे उमेदवारांचे लक्ष लागले होते. जवळपास एका महिन्यापूर्वीच राज्यातील ८४ हजार ४१३ उमेदवारांनी मध्यम,विषय,गुणनिहाय प्राधान्यक्रम दिले होते. त्यात शासकीय,स्थानिक स्वराज्य संस्था,अनुदानित संस्थासाठी विद्यार्थ्यांना स्वतंत्र प्राधान्यक्रमाची प्रक्रिया झाली. उमेदवारांनी प्राधान्यक्रम भरण्याची प्रक्रिया पूर्ण करून आपली संपूर्ण माहिती पवित्र पोर्टलवर भरलेली होती.

  नियुक्तीपात्रांविषयी अनिश्चितता  

सध्या नागपूर येथील न्यायलयात (खंडपीठात) भरतीतील उमेदवारांना नियुक्तपत्र देण्याविषयी तात्पुरती स्थगिती देण्यात आली असून,न्यायालया पुढील सुनावणीत काय नियुक्तीपात्राविषयी काय निर्णय देते. आणि शासन या निर्णयांनतर कोणती पावले उचलते याकडेही उमेदवारांचे लक्ष लागले आहे.

“ सध्या शिक्षकभरती वर न्यायालयाच्या याचिकेचे सावट असून, नियुक्ती पत्रावरील तात्पुरती स्थगिती विषयी व निवडयादी पारदर्शक पद्धतीने लागावी यासाठी डी टी एड बी एड स्टुडंट असोसिएशन संघटनेचे पदाधिकारी लवकरच शिक्षण आयुक्त व शिक्षण मंत्र्यांची भेट घेऊ

संतोष मगर,संघटनेचे अध्यक्ष

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com