"एकच मिशन, वंजारी आरक्षण...वाढीव आरक्षणासाठी समाजाचा मोर्चा 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 सप्टेंबर 2019

नाशिक : "एकच मिशन, वंजारी आरक्षण' अशी गगणभेदी घोषणाबाजी करीत, वंजारी आरक्षण कृती समितीतर्फे आज शहरातून समाजासाठी वाढीव आरक्षणाच्या मुख्य मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला. युवक-युवती, महिलांचा मोर्चामध्ये लक्षणीय सहभाग होता. शहराच्या मध्यवस्तीतून काढण्यात आलेल्या या मोर्चात घोषणा देत शहरवासीयांचे लक्ष्य वेधून घेतले. दरम्यान, आरक्षणासह विविध मागण्यांसंदर्भातील निवेदन समाज कन्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. मोर्चासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता. 
... 

नाशिक : "एकच मिशन, वंजारी आरक्षण' अशी गगणभेदी घोषणाबाजी करीत, वंजारी आरक्षण कृती समितीतर्फे आज शहरातून समाजासाठी वाढीव आरक्षणाच्या मुख्य मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला. युवक-युवती, महिलांचा मोर्चामध्ये लक्षणीय सहभाग होता. शहराच्या मध्यवस्तीतून काढण्यात आलेल्या या मोर्चात घोषणा देत शहरवासीयांचे लक्ष्य वेधून घेतले. दरम्यान, आरक्षणासह विविध मागण्यांसंदर्भातील निवेदन समाज कन्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. मोर्चासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता. 
... 
गंगापूर नाक्‍यावरील क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्थेच्या प्रांगणातून वंजारी समाज आरक्षण कृती समितीतर्फे जिल्हास्तरीय मोर्चाला प्रारंभ झाला. मोर्चात समितीतील आमदार नरेंद्र दराडे, किशोर दराडे, बाळासाहेब सानप, व्ही.एन. नाईक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पंढरीनाथ थोरे, सरचिटणीस हेमंत धात्रक, संचालक दामोधर मानकर, माजी महापौर अशोक मुर्तडक आदींसह पदाधिकाऱ्यांसह जिल्हाभरातून हजारो समाज बांधव सहभागी झाले होते. 

वंजारी समाजाचा भटक्‍या-विमुक्त गटाच्या ड गटात समावेश असून अवघे 2 टक्के आरक्षण आहे. समाजाची लोकसंख्येनुसार आरक्षण अत्यंत तोकडे असल्याने वाढीव आरक्षणाच्या प्रमुख मागणीसाठी वंजारी समाज आरक्षण समितीतर्फे मोर्चाचे आयोजन करण्यात आल्याचे आमदार नरेंद्र दराडे यांनी मोर्चाच्या प्रारंभी प्रास्ताविकात सांगत, येत्या 12 डिसेंबर रोजी मुंबईतील आझाद मैदानावर राज्यस्तरीय मोर्चा काढण्यात येणार असल्याचे यावेळी सांगितले. यावेळी मोर्चेकरूंच्या हाती भगवा ध्वज, वाढीव आरक्षणाच्या मागणीचे फलक आणि समाजाच्या आरक्षणाच्या घोषणांनी शहरवासियांचे लक्ष वेधून घेतले.

  मोर्चाच्या अग्रभागी भजनी मंडळाचे पथक टाळ-मृदुंगासह होते. त्यापाठोपाठ महाविद्यालयीन विद्यार्थिनी, युवती, महिला, युवक, समाज बांधव मोर्चेकरू होते. मोर्चात ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक, युवतींचा लक्षणीय सहभाग नोंदविला. व्ही. एन. नाईक महाविद्यालयाच्या प्रांगणातून मोर्चाला प्रारंभ झाला. त्यानंतर कॅनडा कॉर्नर, शरणपूररोड, राजीव गांधी भवन, जुनी पंडीत कॉलनी, गंगापूर रोड मार्गे जुना गंगापूर नाका, डोंगरे वस्तीगृहावरून पुन्हा महाविद्यालयाच्या प्रांगणात मोर्चाचा समारोप झाला. मोर्चासाठी सहाय्यक पोलीस आयुक्त प्रदीप जाधव यांच्या नेतृत्वाखाली सरकारवाडयाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत सोमवंशी, म्हसरुळचे संजय सांगळे, सुभाषचंद्र देशमुख यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांचा कडेकोट पोलीस बंदोबस्त होता. 

वंजारी आरक्षणाचा टोप्या 
"आम्ही वंजारी', "वाढीव आरक्षण' अशा संदेशाच्या गांधी टोप्या समाज बांधवांनी डोक्‍यात घातल्या होत्या. तसेच, "एकच मिशन, वंजारी आरक्षण', "नको आम्हाला आश्‍वासन, हवे आम्हाला आरक्षण', "आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे' अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. 
 
या आहेत मागण्या.. 
* वंजारी समाजास 10 टक्के आरक्षण द्यावे 
* वंजारी समाजाच्या विद्यार्थ्यांठी जिल्हानिहाय वसतीगृहांची उभारणी करावी 
* नॉनक्रिम्रिलेयर प्रमाणपत्राची अट रद्द करावी 
* सारथी, बार्टीच्या धर्तीवर एनटीडी योजना राबवावी 
* उद्योग, व्यवसायांसाठी विना व्याज कर्ज उपलब्ध करून द्यावे 
* गोपीनाथ मुंढे महामंडळाची स्थापना करावी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news vanjari community