Vidhan Sabha 2019 : शरद पवार यांची नाशिक जिल्ह्यात सभा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 ऑक्टोबर 2019

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांची गुरुवारी (ता.१७) नाशिक जिल्ह्यातील सटाणा, निफाड, नांदगाव तालुक्यात तर नाशिक शहरातील नाशिक पूर्व विधानसभा व नाशिक पश्चिम विधानसभेतील उमदेवारांच्या प्रचारासाठी सभा आयोजित करण्यात आली आहे.

नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांची गुरुवारी (ता.१७) नाशिक जिल्ह्यातील सटाणा, निफाड, नांदगाव तालुक्यात तर नाशिक शहरातील नाशिक पूर्व विधानसभा व नाशिक पश्चिम विधानसभेतील उमदेवारांच्या प्रचारासाठी सभा आयोजित करण्यात आली आहे.सकाळी १० वाजता सटाणा, दुपारी १२.३० वाजता पिंपळगाव बसवंत, दुपारी ३ वाजता नांदगाव येथे सभा होणार आहे. देवळाली विधानसभेतील उमेदवार सरोज अहिरे व नाशिक पुर्व विधानसभेतील उमेदवार बाळासाहेब सानप यांच्या प्रचारार्थ संयुक्त सभा सायंकाळी ५ वाजता पंचवटी मधील मखमलाबाद येथे तर नाशिक पश्चिम विधानसभेतील उमेदवार डॉ.अपूर्व हिरे यांच्या प्रचारार्थ सायंकाळी ७ वाजता सिडको येथील पवननगर येथे  शरद पवार यांची सभा होणार असल्याचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी कळवले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Meeting of Sharad Pawar in Nashik District