Vidhan Sabha 2019 : देवळालीत परिवर्तन अटळ - सरोज अहिरे  

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 ऑक्टोबर 2019

देवळाली मतदारसंघाची निवडणूक यंदा ऐतिहासिक होणार असून तीस वर्षांपासून असलेली एका कुटुंबाची सत्ता आता संपुष्टात येणार आहे. त्यामुळे परिवर्तन हे अटळ असल्याचा दावा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवार सरोज अहिरे करत आहेत.

नाशिक : देवळाली मतदारसंघाची निवडणूक यंदा ऐतिहासिक होणार असून तीस वर्षांपासून असलेली एका कुटुंबाची सत्ता आता संपुष्टात येणार आहे. त्यामुळे परिवर्तन हे अटळ असल्याचा दावा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवार सरोज अहिरे करत आहेत.

यंदा मतदारांना सक्षम पर्याय उपलब्ध - सरोज अहिरे

देवळाली मतदारसंघात प्रचारादरम्यान मतदारांशी संवाद साधताना अहिरे बोलत होत्या. येथील सिन्नर फाटा, निसर्ग लॉन्स, निसर्ग धोनी, खर्जुल मळा, मराठा कॉलनी, दत्त नगर, विजयनगर, पंपीग स्टेशन, चेहेडी गाव, चाडेगाव, सामनगाव रोड, अश्विनी कॉलनी, ओढा रोड, मथुरा चौक, विहीतगाव, विठ्ठल मंदिर, मुजनवाडा, लॅम रोड, महाराजा बसथांबा, सौभाग्य नगर आदी भागांमध्ये जाऊन मतदारांच्या अहिरे यांनी भेटीगाठी घेतल्या. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. अहिरे पुढे म्हणाल्या की, येथील मतदारांना सक्षम पर्याय उपलब्ध नव्हता. या वेळेला मतदारांना सक्षम पर्याय उपलब्ध असून जनता परिवर्तन करणार आहे.सरकारबाबत मतदारांमध्ये सर्वात जास्त रोष आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP's Congress candidate Saroj Ahire claims that the change is inevitable.