काय म्हणावं! प्रचारासाठी पालकसभाही सोडली नाही...

election prachar.jpg
election prachar.jpg

नाशिक : विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. त्यामुळे रिंगणातील उमेदवारांकडून मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले जात आहेत. मात्र नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातील एका उमेदवाराने शाळेच्या पालकसभेलाच हजेरी लावत प्रचाराचा प्रयत्न केला. परंतु पालकांच्या रोषामुळे वातावरण चिघळले. शेवटी उमेदवारासह शाळेच्या व्यवस्थापन समितीनेही काढता पाय घेतला आणि पालकांना शांत करण्यासाठी अखेर पोलिसांनाच मध्यस्थी करावी लागली. परंतु या घटनेची शहरभर रंगतदार चर्चा मात्र रंगली. 

पालकांचा रोष पाहून सारेच पसार
नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात चुरशीची तिरंगी लढत होते आहे. प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. त्यामुळे प्रत्येक उमेदवारांकडून मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्याच निमित्ताने निवडणुकीच्या रिंगणातील एका उमेदवाराने थेट एका शाळेशी संधान साधले. शाळेच्या व्यवस्थापनानेही तात्काळ पालकांना विद्यार्थ्यांमार्फत संदेश पाठवून गुरूवारी (ता.१७) सकाळी शाळेमध्ये पालक सभा असल्याचे कळविले. या सभेला पालकांनी हजेरी न लावल्यास १०० रुपये दंड भरावा लागेल अशी तंबीही शाळेने दिली होती. त्यामुळे पालकसभा गांभीर्यांने घेत पालकांनी हजेरी लावली. 

पोलिसांना करावे लागले पाचारण 

प्रत्यक्षात, पालक सभेवेळी संबंधित उमेदवार त्यासाठी आले आणि त्यांनी आपल्या प्रचाराचे भाषण सुरू केले. सदरची बाब काही पालकांना खटकली आणि त्यांनी त्यास विरोध करीत शाळेच्या प्रशासनाला धारेवर धरले. ते पाहून साऱ्याच पालकांनी अशा अनिष्ठ प्रकाराला विरोध करीत आगपाखड केली. त्यामुळे वातावरण तणावाचे झाले. हे पाहून संबंधित उमेदवाराने पालक सभेतून काढता पाय घेतला. त्यानंतरही पालकांनी शाळेच्या व्यवस्थापनाला धारेवर धरत जाब विचारला. त्यामुळे त्यांनीही काढता पाय घेतला. मात्र पालकांचा रोष पाहता, त्यांना शांत करण्यासाठी अखेर पोलीसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी मध्यस्थी करीत सदरचे वातावरण शांत केल्यानंतर पालकांनी पालक सभा सोडली. परंतु या घटनेची चर्चा साऱ्या शहरभर झाली आणि तितक्‍याच रंगतदार होऊन ती चर्चिलीही गेली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com